केवळ 2 लोक चालवतात ही बॅंक, एकूण संपत्ती 24 कोटी रूपये; वेबसाइट-एटीएम काहीच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:14 PM2023-05-12T12:14:37+5:302023-05-12T12:15:03+5:30
Bank in America Has Just 2 Employees : जर तुम्हाला कुणी सांगितलं की, या विकसित देशात एक अशीही बॅंक आहे, ज्यात केवळ काही कोटी रूपये जमा आहेत, तर कुणाचा विश्वास बसणार नाही.
Bank in America Has Just 2 Employees : काही देशांची नावे डोळ्यांसमोर आली की, त्यांच्याकडे किती पैसा आणि किती मोठमोठ्या कंपन्या असतील याचा विचार मनात येतो. खासकरून अमेरिकेबाबत सांगायचं तर हा देश बॅंकिंग सेक्टरसाठी फार प्रसिद्ध आहे. अशात जर तुम्हाला कुणी सांगितलं की, या विकसित देशात एक अशीही बॅंक आहे, ज्यात केवळ काही कोटी रूपये जमा आहेत, तर कुणाचा विश्वास बसणार नाही.
अमेरिकेत एक अशी बॅंक आहे ज्याची एकूण संपत्ती 3 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार, साधारण 25 कोटी रूपये इतकीच आहे. ही बॅंक या देशीत अधिकृत सगळ्यात छोटी बॅंक आहे. या बॅंकेचं नाव Kentland Federal Savings and Loan आहे. चला जाणून घेऊ या बॅंकेबाबत...
केवळ दोन लोकांचा स्टाफ
Kentland Federal Savings and Loan बॅंक 1920 मध्ये स्थापित करण्यात आली होती. त्यावेळी ही बॅंक आताच्या बॅंकच्या सीईओच्या पंजोबाने बनवली होती आणि याची एकच ब्रांच आहे. जी इंडियानाच्या केंटलॅंडमध्ये आहे. बॅंकेकडून केवळ तीन प्रकारच्या सेवा देण्यात येतात. सेव्हिंग अकाउंट उघडणे, होम लोन देणे आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉज़िट उघडणे. बॅंकेचे सीईओ जेम्स ए सॅमसन यांनी ब्लूमबर्गसोबत बोलताना सांगितलं की, लोकांना इथे त्यांचे पैसे फार सुरक्षित वाटत होते, कारण ही बॅंक 1920 मध्ये सुरू झाली होती. ही बॅंक कधीच बंद झाली नाही.
ना एटीएम ना ट्रांझॅक्शन फी
55 वर्षीय सीईओ सॅमसन म्हणाले की, त्यांना वाटतं की, बॅंक त्यांच्यासोबत संपेल. कारण बऱ्याच गोष्टी बदलत चालल्या आहेत. सध्या केवळ यासाठी सुरू आहे कारण इथे सेव्हिंग अकाउंट आणि लोनवर थोडा बरा रेट दिला जात आहे. त्याशिवाय इथे कोणताही इन्कम सोर्स नाही. कारण बॅंक ना एटीएम फी घेत ना वायर किंवा ट्रांझॅक्शन फी. अशात काही वर्षात ही बॅंक एक इतिहास ठरेल.