टॉयलेटमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसाल तर वाजेल 'भोंगा', कर्मचारीही धडकतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:04 PM2019-10-18T12:04:55+5:302019-10-18T12:09:17+5:30
आपण जर पाहिलं तर शहरांमध्ये दिवसेंदिवस टॉयलेट्सही अधिक स्मार्ट केले जात आहेत. टॉयलेट्स आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने तयार केले जातात.
आपण जर पाहिलं तर शहरांमध्ये दिवसेंदिवस टॉयलेट्सही अधिक स्मार्ट केले जात आहेत. टॉयलेट्स आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने तयार केले जातात. चीनच्या शांघायमध्ये १५० असे स्मार्ट पब्लिक टॉयलेट्स तयार केले आहेत, जे तुम्हाला १५ मिनिटांपेक्षा अधिक आत बसू देणार नाहीत. म्हणजे आता टॉयलेट सीटवर बसून पेपर वाचणे, गेम खेळणे, मोबाइल बघणे आणि पुस्तक वाचण्याचे दिवस जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांना जाणार अलर्ट
शांघाय सार्वजनिक शौचालयात 'स्मार्ट टॉयलेट' लावण्यात आले आहेत. पुढे हे टॉयलेट एअरपोर्ट आणि इतर ठिकाणांवरही लावले जाणार आहेत. यात जर एखादी व्यक्ती १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसेल तर लगेच अलार्म वाजणार आहे. इतकेच नाही तर टॉयलेटमधून एक अलर्ट महापालिका कर्मचाऱ्यांना देखील जाईल. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तिथे पोहोचतील.
ह्यूमन बॉडी सेंसर
या टॉयलेट्समध्ये ह्यूमन बॉडी सेंसर लावण्यात आले आहेत. यावरून हे माहिती घेतली जाते की, व्यक्ती कधीपासून टॉयलेटमध्ये बसली आहे. तसेच या स्मार्ट टॉयलेटमुळे पाण्याचा अपव्यय सुद्धा कमी होणार आहे.
आता हे स्मार्ट टॉयलेट चीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लावण्याचं प्लॅनिंग आहे. चीनमधील ७०० पेक्षा अधिक शहरांनी या प्रस्तावात इंटरेस्ट दाखवला आहे. शांघायमधील लोकांमध्ये या स्मार्ट टॉयलेटबाबर संमिश्र प्रतिक्रिया आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, अनेकांना बालपणापासूनच टॉयलेटमध्ये २० ते २५ मिनिटे वेळ घालवण्याची सवय असते.