VIDEO : विग आणि प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं ३० लाख रूपयाचं सोनं, अधिकारीही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:39 PM2022-04-21T12:39:38+5:302022-04-21T12:41:39+5:30

दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी एका तस्कराला अटक केली आहे. ज्याच्याकडून ३० लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं ताब्यात घेतलं आहे.

Smuggler catch at airport who concealed gold inside his wig and rectum of 30 lakhs | VIDEO : विग आणि प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं ३० लाख रूपयाचं सोनं, अधिकारीही झाले हैराण

VIDEO : विग आणि प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं ३० लाख रूपयाचं सोनं, अधिकारीही झाले हैराण

Next

Gold Smuggling Video: सोन्याची तस्करी करणारे गुन्हेगार सोने तस्करीसाठी वेगवेगळ्या आणि विचित्र पद्धतींचा वापर करतात. कधी कधी तर त्यांच्या आयडिया पाहून हैराण व्हायला होतं. पण त्यांनी कितीही हुशारी दाखवली तरी ते कस्टमच्या अधिकाऱ्यांपासून वाचू शकत नाहीत. दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी एका तस्कराला अटक केली आहे. ज्याच्याकडून ३० लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे ५०० ग्रॅमपेक्षा जास्त सोनं सापडलं.

हा तस्कर अबूधाबीहून भारतात सोनं घेऊन आला होता. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे तस्कराने आपल्या विग आणि मलाशयाच्या आत सोनं लपवून ठेवलं होतं. अधिकाऱ्यांना या तस्कराकडे ६३०.४५ ग्रॅम सोनं सापडलं. ज्याची किंमत ३०.५५ लाख रूपये सांगितली जात आहे. जेव्हा कस्टम अधिकाऱ्यांना तस्कराच्या विगमध्ये सोनं असल्याचं समजलं तेव्हा ते हैराण झाले. त्यांनी याचा व्हिडीओही शेअर केला आहे. 

एअरपोर्टवर तैनात अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोनं ताब्यात घेऊन तस्कराला अटक करण्यात  आली आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तस्कर IGI एअरपोर्टच्या टर्मिनल ३ वर पकडला गेला. त्याने त्याच्या विग आणि मलाशयात ३०.५५ लाखाचं सोनं लपवलं होतं. 
 

Web Title: Smuggler catch at airport who concealed gold inside his wig and rectum of 30 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.