नागिणीचा बदला! नागाला मारणाऱ्या व्यक्तीला ७ वेळा केला दंश, सिनेमासारखीच आहे घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 12:07 PM2022-04-16T12:07:58+5:302022-04-16T12:08:32+5:30
एहसानने काठीने हल्ला करत नागाला मारलं आणि नागिण जीव वाचवून निघून गेली. असं सांगितलं जात आहे की, नागिणीने सूड घेण्यासाठी एहसानवर अनेकदा हल्ला केला.
उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका नागिणीनं कथितपणे नागाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी एका व्यक्तीला ७ वेळा दंश मारला. पण तो प्रत्येकवेळी वाचला. ही घटना समोर आल्यावर सगळे हैराण झाले आहेत. मिर्जापूर गावात राहणारा एहान उर्फ बबलू एका कृषी फार्ममध्ये नोकरी करतो. सात महिन्याआधी त्याचा सामना एका नागासोबत आणि नागिणीसोबत झाला होता. एहसानने काठीने हल्ला करत नागाला मारलं आणि नागिण जीव वाचवून निघून गेली. असं सांगितलं जात आहे की, नागिणीने सूड घेण्यासाठी एहसानवर अनेकदा हल्ला केला.
एखाद्या फिल्मी कहाणीप्रमाणे नागीण संधी मिळताच एहसानला दंश मारला. पण वेळीच उपचार केल्याने तो वाचला. काही दिवसांनी पुन्हा एकदा नागीणने त्याच्यावर हल्ला केला आणि तो पुन्हा वाचला. असं करत करत नागिणने त्याच्यावर सात वेळा हल्ला केला. पण तो प्रत्येकवेळी वाचण्यात यशस्वी ठरला. नागिणीच्या सूडाची ही कहाणी ऐकून सगळेच हैराण आहेत. नागिणीच्या हल्ल्यादरम्यान एहसानने स्वत: नागिणीवर अनेकदा हल्ला केला पण नागिणही वाचली.
नागीण आणि एहसानमधील या युद्धात निसर्ग दोघांनाही साथ देत आहे. पण याचा अंत काय होईल हे कुणालाच माहीत नाही. परिसरात ही कहाणी चर्चेचा विषय ठरत आहे. यावर एहसान म्हणाला की, तो गरिब आहे आणि मजुरी करून आपल्या परिवाराचं पोट भरतो. ७ महिन्याआधी त्याला दोन साप दिसले होते. त्यातील एकाला मारून त्याने जमिनीत गाडलं होतं. त्यानंतर नागिणीने त्याला अनेकदा दंश मारला. शेतात काम करताना नागिणीने सात वेळा दंश मारला. मला चार लहान मुलं आहेत आणि आता मी सतत घाबरून राहतो. मला भिती वाटते की, मला काही झालं तर माझ्या परिवाराचं काय होईल.
फार्मचे मालक सत्येंद्र म्हणाले की, सात महिन्यांआधी सापाने एहसानला दंश मारला होता. दोनपैकी एका सापाला त्याने मारलं होतं. तेव्हापासून साप त्याला दंश मारतो आणि त्याला हॉस्पिटलला जावं लागतं. त्याला चार लहान मुलं आहेत. सापाने त्याला ७ वेळा दंश मारला. साप कोब्रा प्रजातीचा आहे. एहसान आता घाबरून जगत आहे.