या गावातील लोक बिनधास्त करतात सापांची शेती, लाखो रूपयांची करतात कमाई...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 10:03 AM2023-07-08T10:03:12+5:302023-07-08T10:03:52+5:30
Snake Farming : ग्राहकांची मागणी पाहता चीनमधील अनेक शेतकरी सापांची शेती करू लागले आहेत. काही लोक सापांना बघून घाबरून पळून जातात चीनमधील काही गावांमध्ये सापांची शेती केली जाते.
Snake Farming In China: चीनच्या अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. चीन शेतीमध्येही इतर देशांच्या पुढे निघाला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण चीनमध्ये सापांचीही शेती केली जाते. ग्राहकांची मागणी पाहता चीनमधील अनेक शेतकरी सापांची शेती करू लागले आहेत. काही लोक सापांना बघून घाबरून पळून जातात चीनमधील काही गावांमध्ये सापांची शेती केली जाते.
का केली जाते सापांची शेती?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटते की, चीनमधील सापांची शेती का करतात? चीनच्या चिकित्सा पद्धतीमध्ये सापांच्या विषाने अनेक उपचार केले जातात. यात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचाही समावेश आहे. इतकंच नाही तर इथे जन्माला येणाऱ्या सापांना अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया आणि जर्मनीमध्येही पाठवलं जातं. साप हे जगातल्या सगळ्यात घातक जीवांमध्ये मोजले जातात. पण चीनच्या जिसिकियाओ गावात जवळपास 30 लाख साप पाळले जातात.
आता अनेकांना प्रश्न पडेल की, चीनमध्ये सापांची शेती कधीपासून केली जाते? 1980 पासून या भागांमध्ये सापांना पाळण्याची परंपरा सुरू आहे. ते पाळण्यासाठी जुन्या पद्धतीचा वापर केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे साधारण असे फार्म आहेत जिथे सापांना पाळण्याचं काम केलं जात आहे. गावातील साधारण 1 हजारांपेक्षा जास्त लोक हेच काम करतात. तेच या कामातून लाखो रूपयांची कमाई करतात.