खतरनाक! साप किड्याला संपवायला गेला पण किडा होता इतका विषारी की सापच मेला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 06:51 PM2022-03-18T18:51:37+5:302022-03-18T18:55:05+5:30

सापाने एका अशा विषारी किड्याला आपलं भोजन बनवण्याचा प्रयत्न केला होता, तो त्याच्यापेक्षाही खतरनाक आणि जीवघेणा होता.

snake killed by more poisonous insect than him named centipede in florida | खतरनाक! साप किड्याला संपवायला गेला पण किडा होता इतका विषारी की सापच मेला

खतरनाक! साप किड्याला संपवायला गेला पण किडा होता इतका विषारी की सापच मेला

googlenewsNext

सहसा साप (Snake) हा सगळ्यात विषारी जीव आहे, असा आपला समज असतो. असंही सांगितलं जातं की सापाच्या काही प्रजाती सोडल्या तर बहुतेक साप हे अतिशय विषारी असतात. साप एखाद्याला चावला, तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य असतं. प्रत्येक सापाचं विष शरीरावर वेगळा परिणाम करतं, तसंच प्रत्येक साप चावल्यानंतर उपचारही वेगवेगळे असतात.

फ्लोरिडामध्ये एक असा साप आढळून आला, जो अतिशय लाजाळू असतो आणि सहसा सगळ्यांपासून लपूनच शिकार करतात. या लाजाळू प्रजातीच्या सापाला सर्वांसमोर खुल्या वातावरणात आपलं भोजन करणं आवडलं नाही आणि यादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याने (Snake Died after ate Centipedes) वन्यजीव अधिकाऱ्यांची चिंताही वाढली. मृत सापाच्या तोंडात त्याने खाल्लेल्या शिकारीचे पुरावेही मिळाले, जे त्याच्या मृत्यूचं कारण मानलं जात आहेत.

सापाने एका अशा विषारी किड्याला आपलं भोजन बनवण्याचा प्रयत्न केला होता, तो त्याच्यापेक्षाही खतरनाक आणि जीवघेणा होता. फ्लोरिडा मत्स्य आणि वन्यजीव संरक्षण आयोगाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या फ्लोरिडामदील जॉन पेनीकँप कोरल रीफ स्टेट पार्कमध्ये फिरत असताना एका व्हिजिटरची नजर अतिशय अजब गोष्टीवर पडली. त्याला तोंडात एका किड्याला पकडलेला मृत साप दिसला.

वन्यजीव अधिकाऱ्यांनी म्हटलं की ही रिम रॉक ही सापाची प्रजाती अतिशय दुर्मिळ आहे, 2015 नंतर ही प्रजाती कुठेही दिसली नाही. तपासात समजलं की या दुर्लभ सापाच्या मृत्यूचं कारण एक विषारी किडा आहे. एफडब्ल्यूसीने म्हटलं की या सापांमध्ये सहसा सेंटीपीड किड्याच्या विषासोबत लढण्याची क्षमता असते. मात्र कदाचित यावेळी दोघांचा आमना-सामना झाला तेव्हा हे सगळंच बदललं. काहीतरी असं घडलं असेल ज्याबद्दल अजून कोणालाच माहिती नाही.

Web Title: snake killed by more poisonous insect than him named centipede in florida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.