सापाचं विष जीवघेणं असतं, मग त्याच विषाने नशा कशी करतात लोक?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 02:01 PM2024-03-23T14:01:55+5:302024-03-23T14:03:00+5:30
लोक सापाच्या विषाची नशा कशी करतात. कारण सापाचं विष तर फार घातक आणि जीवघेणं असतं.
जगात सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. यातील काही साप बिनविषारी असतात तर काही साप विषारी असतात ज्याच्या दंशामुळे जीवही जातो. सध्या यूट्यूबर एल्विश यादवच्या अटकेपासून सापाच्या विषाची चर्चा वाढली आहे. सापाच्या विषारी तस्करी केली जाते. पण याबाबत अनेकांना काहीच माहीत नसतं. आज तेच जाणून घेऊ..
यूट्यूबर एल्विश यादव केस समोर आल्यापासून सगळ्यांना हे जाणून घ्यायचं आहे की, लोक सापाच्या विषाची नशा कशी करतात. कारण सापाचं विष तर फार घातक आणि जीवघेणं असतं.
सापाचं किंवा सापाच्या विषाचं नाव काढल्यावर कुणालाही घाम फुटतो. कारण हे सगळ्यांनाच माहीत आहे की, विषारी सापाने दंश मारला तर काही सेकंदात जीव जातो. पण कमालीची बाब म्हणजे आजकाल रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर खूप वाढला आहे.
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या एका रिसर्चनुसार, आजकाल लोक साप किंवा विंचवासारख्या रेप्टाइल्सच्या विषाचा वापर मनोरंजक उद्देशांसाठी आणि नशेच्या पदार्थांना पर्याय म्हणून वापरलं जातं.
सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की, लोक सापाच्या विषाची नशा कशी करतात? इंडियन जर्नल ऑफ फिजियोलॉजी अॅंड फार्माकोलॉजी रिसर्च पेपरनुसार, सापाच्या विषाची नशा करण्यासाठी लोक सामान्यपणे सापाला आपल्या ओठांजवळ नेऊन दंश मारण्यास भाग पाडतात. त्याशिवाय नशा करण्यासाठी लोक ओठ, जीभ किंवा कानाच्या लोबवरही सापाकडून दंश मारून घेतात.
तसेच जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. एका माहितीनुसार, नशा करण्यासाठी यांच्या काही खास प्रजातींचा वापर केला जातो. यासाठी या सापांची तस्करी केली जाते. या सापांचं विष फार जास्त घातक नसतं की, जीवही जाईल.
एका कायद्यानुसार वेगवेगळ्या प्रजातीच्या आणि जंगली जीवांचा असा गैरवापर करणं एक गंभीर गुन्हा आहे. कायद्यानुसार यासाठी तीन ते चार वर्षाची शिक्षा होऊ शकते.