Snake Video: गळ्यात साप गुंडाळून रस्त्याने फिरताहेत लोक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 04:50 PM2021-08-08T16:50:39+5:302021-08-08T17:16:18+5:30
Social Media Snake Video: आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
नवी दिल्ली: सोशल मीडियावर अनेकदा काही विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. यांना पाहून तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांना धक्का बसतो किंवा आपण चकीत होतो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत गळ्यात खरेखुरे साप गुंडाळलेले लोक रस्त्याने फिरताना दिसत आहेत.
सापांना घेऊन रस्त्यावर उतरले लोक
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा ट्विटरवर खूप अॅक्टीव्ह असतात. ते आपल्या अकाउंटवर अनेक व्हिडिओ अपलोड करत असतात. नुकतंच त्यांनी सापांच्या यात्रेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत लोक सापांना घेऊन रस्त्याने फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, पण साप घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर थोडीही भीती दिसत नाहीये.
Is this #SnakeCatchers Parade ?😊😢👌👌👍
— Rupin Sharma IPS (@rupin1992) August 7, 2021
सांप पकड़ने वालों की यात्रा ?😊😊👌👌
Anyone? Where? Location and Occasion ?@ShekharGupta@Amitabhthakur@wti_org_india@ParveenKaswan@susantananda3@SudhaRamenIFS@arunbothrapic.twitter.com/bpx55yQ48G
सापांसोबत मैत्री
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत लोकांची सांपांसोबतची बॉन्डिंग दिसत आहे. यातील काहींनी सापाला गळ्यात गुंडाळलंय तर काहींनी हातात घेतलंय. सापं घेऊन येणाऱ्या लोकांना पासून परिसरातील लोक घाबरुन बाजूला सरकत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. पण, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये काही युझर याला उत्तर प्रदेशातील तर काही लोक बिहारमधील असल्याचे सांगत आहेत.