एक असा देश जिथे अजिबातच आढळत नाहीत साप, जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 04:36 PM2019-09-20T16:36:57+5:302019-09-20T16:48:45+5:30
तसा तर ब्राझील हा सापांचा देश मानला जातो. कारण इथे एवढे साप आहेत की, जगात दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाहीत. पण जगात असाही एक देश आहे जिथे अजिबातच साप आढळत नाहीत.
तसा तर ब्राझील हा सापांचा देश मानला जातो. कारण इथे एवढे साप आहेत की, जगात दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाहीत. पण जगात असाही एक देश आहे जिथे अजिबातच साप आढळत नाहीत. आयरलॅंड या देशात एकही साप आढळत नाही. पण याचं कारण काय आहे? हे जाणून घेऊ.
आयरलॅंडमध्ये साप नाहीत, याबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्यात. त्याआधी आयरलॅंडबाबत काही जाणून घेऊ. आयरलॅंडमध्ये मनुष्य असण्याचे पुरावे १२८०० इ.पू च्या आधीचे आहेत. त्यासोबतच इथे एक असा बार आहे, ज्याची सुरूवात ९०० वर्षांआधी करण्यात आली होती. या बारचं नाव 'सीन्स बार' असं आहे.
टायटॅनिक या जगप्रसिद्ध जहाजाबाबत तुम्हाला माहीत असेलच. हे जगातलं सर्वात मोठं जहाज होतं. १४ एप्रिल १९१२ मध्ये हे जहाज समुद्रात बुडालं होतं. हे जहाज उत्तर आयरलॅंडच्या बेलफास्ट शहरात तयार करण्यात आलं होतं.
आता आपण हे जाणून घेऊ की, इथे सापं का नाहीत. यामागे एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की, आयरलॅंडमध्ये ख्रिस्ती धर्माची सुरक्षा करण्यासाठी सेंट पॅट्रिक नावाच्या एका संताने देशातील सर्वच सापांना एकत्र केलं आणि आयरलॅंडमधून काढून समुद्रात फेकून दिलं. हे काम त्यांनी ४० दिवस उपाशी राहून केलं होतं.
तर दुसरीकडे यावर वैज्ञानिकांचं मत आहे की, आयरलॅंडमध्ये कधीच साप नव्हते. याचा कोणताही लेखी रेकॉर्ड नाही. त्यामुळे इथे साप होते असं म्हणणं चुकीचं ठरेल.
आयरलॅंडमध्ये साप नसण्याबाबत आणखी एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे इथे साप असायचे, पण फार जास्त थंडीमुळे ते येथून विलुप्त झालेत. तेव्हापासून हेच मानलं जातं की, थंडीमुळे इथे साप आढळत नाहीत.