चीनमध्ये कोरोनाग्रस्तांना दिलं जातंय 'असं' विचित्र औषध, नुसतं वाचूनच सुरू होतील उलट्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 04:24 PM2020-03-27T16:24:02+5:302020-03-27T16:33:26+5:30
चीन सरकारने जिवंत प्राण्यांच्या विक्रीवर बॅन लावला आहे. पण चीनी नागरिक हे प्राणी खाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत आहेत.
चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या महासंकटात जगातली तीन अब्ज लोकसंख्या हैराण झाली आहे. या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 5 लाखांपेक्षा जास्त झाली असून 22 हजारांहून जास्त लोक मारले गेले आहेत.
वटवाघुळातून खवल्या मांजरात आणि खवल्या मांजरातून मनुष्यात पसरलेल्या या व्हायरसमुळे महामारी आल्यावरही चीनमधील लोक अजूनही असे प्राणी खाणं टाळत नाहीयेत. चीन सरकारने जिवंत प्राण्यांच्या विक्रीवर बॅन लावला आहे. पण चीनी नागरिक हे प्राणी खाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत आहेत.
चीन सरकारने जिवंत जनावरांच्या विक्रीवर बंदी घातली असली तरी लोक ऑनलाइन यांची खरेदी करत आहेत. इतकेच नाही तर चीन सरकारने आता त्यांच्या डॉक्टरांना सल्ला दिला आहे की, जंगली जनावरांच्या वेगवेगळ्या अवयवांचा वापर करून तयार केलेली पारंपारिक औषधे कोरोनाने ग्रस्त रूग्णांना द्यावी.
nationalgeographic.com ने दिलेल्या वृत्तानुसार, धक्कादायक बाब म्हणजे ही औषधे अस्वलाच्या पित्तापासून तयार केलेली असतात. नॅशनल हेल्थ कमिशनने गंभीर रूपाने आजारी असलेल्या रूग्णांना हे औषध देण्याची शिफारस केली आहे. चीनने उचललेल्या या पावलावर जगभरातून टीका होत आहे.
हजारो वर्षांपासून वापर
अस्वलाच्या पित्ताचा औषधांसाठी वापर चीनमध्ये हजारो वर्षांपासून केला जात आहे. आशियात आढळणारे अस्वलांच्या गॉलब्लॅडरमधून हे पित्त काढलं जातं आणि यापासून औषध तयार केलं जातं. यात अस्वलाच्या पंजांचा आणि दातांचा देखील वेगवेगळ्या औषधांमध्ये वापर केला जातो. चीन आणि व्हिएतनाममध्ये साधारण 12 हजार अस्वलांना फार्ममध्ये ठेवलं जातं आणि वेळोवेळी पित्त काढलं जातं.
चीनमध्ये जिवंत जनावरांचा खाण्यात आणि औषधे तयार करण्याच हजारो वर्षांपासून वापर केला जात आहे. त्यामुळेच जगभरात साप, कासव, अस्वल, खवल्या मांजर यांची चीनमध्ये तस्करीही होते.
कोरोना व्हायरस पसरल्यानंतर चीन प्रशासनाने वुहानच्या मार्केटमध्ये छापा मारला होता आणि 40 हजार प्राण्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यात साप, कुत्रे, ससे, गाढव इत्यादींचा समावेश होता. दरम्यान, चीनमध्ये अशी मान्यता आहे की, जनावरं मनुष्यांसाठी जिवंत आहेत, त्यांच्यासोबत राहण्यासाठी नाही.
प्राण्यांच्या अवयवांमध्ये हिलींग पावर
पारंपारिक चीनी उद्योगात अशी मान्यता आहे की, प्राण्यांच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये हिलींग पॉवर असते. त्यामुळेच ते प्राण्यांच्या अवयवांचा वापर औषधांमध्ये करतात आणि खाण्यात करतात.
सरकाराने 54 प्रकारच्या जंगली जनावरांना फार्ममध्ये वाढवण्याची आणि त्यांना खाण्याची परवानगी दिली आहे. यात वेगवेगळे प्राणी आहेत. कोरोनाच्या संकटाआधी चीनमध्ये हजारो दुकानांमध्ये यांची विक्री होत होती.