Trending News: आकाशात दिसला अजब-गजब प्रकार, लोकांनी पोलिसांत घेतली धाव, सत्य समोर आलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 10:04 PM2023-01-02T22:04:46+5:302023-01-02T22:05:44+5:30
एलियन्स सारख्या गोष्टींची संकल्पना समोर आली आहे, तेव्हापासून आकाशात घडणारी प्रत्येक अज्ञात गोष्ट मनात शंका निर्माण करते.
Trending News: अनेक वेळा आकाशात अशा गोष्टी दिसतात ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते. याशिवाय जेव्हापासून एलियन्स सारख्या गोष्टींची संकल्पना समोर आली आहे, तेव्हापासून आकाशात घडणारी प्रत्येक अज्ञात गोष्ट मनात शंका निर्माण करते. नुकतेच दक्षिण कोरियात देखील असेच काहीसे घडले. दिवाळीच्या दिवसात आकाशात मोठे फटाके वाजवले जातात. त्या फटाक्यांचा आवाज तर मोठा असतोच, पण त्याबरोबर एखादा फटाका आकाशातही उंच गेलेला दिसतो. याशिवाय, पावसाळ्यातही विजांचा कडकडाट सुरू असताना काही वेळी आकाशात विचित्र आकृती दिसते. पण दक्षिण कोरियाच्या एका भागात, अचानक आकाशात वेगळ्याच प्रकारची चमक दिसली ज्यामुळे पाहून लोक हैराण झाले.
विचित्र आणि रहस्यमय वस्तू
वास्तविक, ही घटना दक्षिण कोरियाची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण कोरियामध्ये अनेक ठिकाणी आकाशात काही विचित्र आणि रहस्यमय वस्तू दिसल्या. एका ठिकाणी लोक इतके घाबरले की ते घराबाहेर पळू लागले. काही लोकांना ती आकृती म्हणजे UFO समजले आणि आश्चर्य वाटले. एवढेच नाही तर काही जण थेट पोलिसांपर्यंतही पोहोचले. पण त्यानंतर जे समोर आलं तर डोकं चक्रावून टाकणारं होतं.
सत्य समोर आलं अन्...
आकाशात पाहायला मिळालेल्या विचित्र गोष्टींबद्दल लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि मग त्या गोष्टीचा उलगडा झाला. ती वस्तू किंवा आकृती म्हणजे नक्की काय आहे हे पोलिसांकडूनच सांगण्यात आले. खरे तर ही चकचकीत वस्तू UFO नसून खुद्द दक्षिण कोरियाच्या लष्कराने प्रक्षेपित केलेले रॉकेट होते. दुसरीकडे, देशाच्या लष्करानेही दुसऱ्या दिवशी याबाबत माहिती दिली. ही एक गुप्त रॉकेट प्रक्षेपण चाचणी होती. त्याच वेळी, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही नमूद केले आहे की अनेकांना ही वस्तू उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचे आढळले. उत्तर कोरियाने गेल्या काही महिन्यांत अनेक वेळा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचण्या केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या घटनेचे अनेक फोटो समोर आले आहेत.