सोशल व्हायरल : पाकिस्तानी रिपोर्टरचं हसून हसून लोळायला लावणारं रिपोर्टिंग
By admin | Published: March 4, 2017 12:14 PM2017-03-04T12:14:13+5:302017-03-04T13:52:40+5:30
पाकिस्तानी रिपोर्टर चांद नवाबनंततर आता अजून एक रिपोर्टर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 4 - पाकिस्तानी रिपोर्टर चांद नवाबनंततर आता अजून एक रिपोर्टर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याची ही रिपोर्टींग पाहिल्यानंतर तुम्हीही हसून लोळायला लागाल. या रिपोर्टरचं नाव आहे अमीन हाफिज. अमीन जिओ न्यूज चॅनेलसाठी रिपोर्टिंग करतात. एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ ट्विट केला असून याला आतापर्यंत अनेकांनी पाहिला असून रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये अमीन पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) अंतिम सामना पाहण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या लोकांशी बातचीत करताना दिसत आहे. पाकिस्तानमधील या टी-20 चा अंतिम सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडिअममध्ये होणार होता. सामन्यासाठी तिकीटाचा दर 500 आणि 8000 रुपये ठेवण्यात आला होता. आता समस्या ही आहे की 500 रुपयांची सर्व तिकीटं संपली असून आता फक्त 8000 रुपयांची तिकीटं बाकी आहेत.
इतकं महागडं तिकीट लोकांना परवडत नाहीत हे सांगण्यासाठी रांगेत उभे असलेल्या लोकांशी अमीन चर्चा करत आहेत. बरं इथपर्यंत सगळं ठीक होतं. यानंतर अचानक त्यांच्या अंगात काय ऊर्जा संचारते माहित नाही आणि 500 रुपयांच्या तिकीटाची मागणी करत भाऊ 500, 500 असं ओरडत नाचायलाच सुरु करतात. एका माणसाल अमीन विचारतात तुम्ही 8000 रुपयांचं तिकीट का विकत घेत नाही ? यावर ते महाशय म्हणतात 'एवढे पैसे असते तर मी दुसरं लग्न नसतं का केलं'...आता बोला.
हे तेच अमीन हाफिज आहेत जे काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमधील ओव्हरब्रीजवरुन जाणा-या गाई आणि म्हशींची मुलाखत घेत होते. याआधी पाकिस्तानचेच रिपोर्टर चांद नवाब यांनी ईदच्या मुहूर्तावर रेल्वे स्थानकावर केलेली रिपोर्टिंग व्हायरल झाली होती. बरं त्यांची प्रसिद्धी एवढी झाली की बजरंगी भाईजान चित्रपटात त्यांच्यापासून प्रेरित एक भुमिकाच ठेवण्यात आली होती
Amin Hafeez's finals ticket reporting is gold. pic.twitter.com/hoC2frJJiu
— Ali. (@iPakistani10) March 2, 2017