भारीच! मराठमोळ्या महिलेची शेती; माती न वापरताच उगवतात भाजी पाला, टेक्निक पाहून चकित व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 07:24 PM2020-07-09T19:24:37+5:302020-07-09T19:38:37+5:30
नीला या अकाऊंटंट आहेत. याशिवाय मॅरेथॉन रनर सुद्धा आहेत.
तुम्ही कधी मातीशिवाय एखादं झाडं किंवा भाजी उगवलेली पाहिलेय का? तुम्ही विचार करत असाल माती शिवाय कोणतंही फुल किंवा भाजी उगवणं कसं शक्य आहे. पण पुण्यातील रहिवासी असलेली नीला रेनविकर ही महिला गेल्या १० वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय झाडं लावून त्यांची काळजी घेत आहे. नीला या अकाऊंटंट आहेत. याशिवाय मॅरेथॉन रनर सुद्धा आहेत. नीला यांच्या घराच्या छतावर ४५० स्वेअर फुटचा परिसर आहे. या परिसरात नीला यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फुलंझाडं लावून त्या जागेचं सौंदर्य खुलवले आहे.
नीला फळं आणि भाज्यांची लागवड करण्यासाठी मातीचा वापर करत नाहीत. सुकलेली पानं, किचनमधील उरलेला कचरा, शेण यांच्या साहाय्याने मिश्रण तयार करून त्यात झाडं लावली जातात. पानांमुळे माती नसतानाही दीर्घकाळ मॉईश्चर टिकून राहते. त्यामुळे झाडं निरोगी राहतात. नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार या कामासाठी फक्त वेळ काढून मेहनत करण्याची आवश्यकता आहे.
नीला यांनी इंटरनेटवर पाहून मातीशिवाय झाडं लावण्याची टेक्निक शिकून घेतली. यु ट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी झाडांची काळजी घेण्याबात लहान लहान गोष्टी शिकून घेतल्या. मातीऐवजी दुसरे कम्पोस्ट तयार करण्यासाठी एका डब्ब्यात त्यांनी सुकलेली पानं, शेणं घातले आणि आठवड्याभरानंतर स्वयंपाकघरातील कचरा त्यात मिसळला. हा प्रक्रियेने एका आठवड्याच्या आत खत तयार झाले.
नीला यांच्या बागेत १०० झाडांच्या कुंड्या आहेत. ज्यात त्या वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या उगवतात. त्यातून येणारी फळं आणि भाज्या नीला आपल्या मित्रमैत्रिणींना वाटतात. इतकंच नाही तर त्यांनी फेसबुकवर ‘ऑर्गेनिक गार्डनिंग' नावावे फेसबुक पेज तयार केले आहे. या माध्यामातून त्या सगळ्यांसोबत ऑर्गेनिक शेतीबाबत टीप्स शेअर करतात.
नीला यांनी सुरूवातील एका बादलीत कंपोस्ट टाकून बीया रुजवल्या. त्यानंतर जवळपास ४० दिवसांनी काकड्या उगवल्या. त्यानंतर त्यांनी टॉमॅटो, मिरची, बटाटा या भाज्या लावायला सुरूवात केली. नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार मातीशिवाय लावलेल्या झाडांचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे झाडांना जास्त पोषण मिळते.
पहिल्यांदाच कोरोनाचं 'असं' रुप आलं समोर; ४ वेळा महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली; अन् मग...
'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या