अद्भूत! पहिल्यांदाच समोर आला सूर्याच्या पृष्ठभागाचा फोटो, आश्चर्यकारक गोष्टीचा झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 11:59 AM2020-02-03T11:59:47+5:302020-02-03T12:01:27+5:30

सूर्य कसा दिसतो हे आजवर केवळ वरवरच समजलं आहे किंवा पाहता आलं आहे. पण सूर्याचा पृष्ठभाग कसा आहे हे अजूनही पूर्णपणे समजू शकलेलं नाही.

A solar telescope first time clicks the close up photo of the sun | अद्भूत! पहिल्यांदाच समोर आला सूर्याच्या पृष्ठभागाचा फोटो, आश्चर्यकारक गोष्टीचा झाला खुलासा!

अद्भूत! पहिल्यांदाच समोर आला सूर्याच्या पृष्ठभागाचा फोटो, आश्चर्यकारक गोष्टीचा झाला खुलासा!

googlenewsNext

सूर्य कसा दिसतो हे आजवर केवळ वरवरच समजलं आहे किंवा पाहता आलं आहे. पण सूर्याचा पृष्ठभाग कसा आहे हे अजूनही पूर्णपणे समजू शकलेलं नाही. हे समजू शकलं नाही कारण सूर्याची उष्णताच इतकी आहे की, त्याच्याजवळ जाऊन संशोधनच करता येत नाही. त्यामुळे सूर्याबाबत जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करत असतात. हवाई बेटावरील डॅनिअल के इनोये सोलार टेलीस्कोपने असाच एक अनोखा प्रयत्न केलाय.

या टेलिस्कोपने सूर्याचा आतापर्यंतचा सर्वात जवळचा आणि अद्भूत फोटो घेण्यात आलाय. हा सूर्याच्या पृष्ठभागाचा असा पहिलाच फोटो आहे. एखाद्या पदार्थासारखा हा सूर्याच्या पृष्ठभागाचा फोटो आहे. सूर्याच्या फारच सूक्ष्म भागाचा हा फोटो आहे.

पृथ्वीहून साधारण १५ कोटी किलोमीटर दूर स्थित सूर्याच्या स्पष्ट फोटोसह एक व्हिडीओ सुद्धा रिलीज करण्यात आलाय. यात सूर्याच्या आत होणारे स्फोट १४ सेकंद दाखवण्यात आले आहेत. 

डॅनियल के. इनोये सोलार टेलीस्कोपने हा फोटो तब्बल ९.३ कोटी मैल लांबून टिपलेला आहे. सूर्याच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे हे कप्पे तयार होतात. आतील उष्ण प्लाज्मा बाहेर येऊन थंड होतो आणि पुन्हा आत जातो. या प्रक्रियेमुळे गडद रंगाच्या रेषा तयार होतात. फोटोमधले हे लहानसे कप्पे महाराष्ट्राच्या दुप्पट मोठ्या आकाराचे असतात.


Web Title: A solar telescope first time clicks the close up photo of the sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.