बाबो! सोन्यापासून तयार 'या' टॉयलेट सीटवर लावले आहेत ४० हजार हिरे, किंमत वाचून व्हाल गार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 11:41 AM2019-11-07T11:41:23+5:302019-11-07T11:44:16+5:30

आता हा फोटो पाहून सर्वातआधी कुणालाही हा प्रश्न पडेल की, यावर बसून नैसर्गिक प्रक्रिया करणार कोण? दुसरा प्रश्न असा की, हे टॉयलेटमध्ये ठेवावं की, हॉलमध्ये?

This solid gold toilet with over 40815 diamonds has taken internet by storm | बाबो! सोन्यापासून तयार 'या' टॉयलेट सीटवर लावले आहेत ४० हजार हिरे, किंमत वाचून व्हाल गार!

बाबो! सोन्यापासून तयार 'या' टॉयलेट सीटवर लावले आहेत ४० हजार हिरे, किंमत वाचून व्हाल गार!

Next

आता हा फोटो पाहून सर्वातआधी कुणालाही हा प्रश्न पडेल की, यावर बसून नैसर्गिक प्रक्रिया करणार कोण? दुसरा प्रश्न असा की, हे टॉयलेटमध्ये ठेवावं की, हॉलमध्ये? तिसरा असा प्रश्न की, यासाठी सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागेल का? हे प्रश्न आम्हाला नाही तर सोशल मीडियावर लोकांना पडले आहेत.

सोनं, बुलेट प्रूफ काच आणि ३३४ कॅरेटचे हिरे

भरपूर महागडी असलेली ही टॉयलेट सीट फारच आकर्षक आहे. शुद्ध सोन्यापासून तयार केलेल्या या सीटचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यात बुलेट प्रूफ काचाचा वापर करण्यात आलाय, ज्यावर ४०,८१५ हिरे जडवण्यात आले आहेत. हे सर्वच हिरे एकूण ३३४.६८ कॅरेटचे आहेत. ही टॉयलेट सीट चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्स्पोमध्ये सोमवारी प्रदर्शित करण्यात आली होती.

किती आहे याची किंमत?

खास बाब ही आहे की, ही सीट हॉंगकॉंगची कोरोनेट या ज्वेलरी ब्रॅन्डने तयार केली आहे. या टॉयलेट सीटची किंमत १,२००,००० डॉलर म्हणजेच ८.५२ कोटी रूपयांची आहे. ज्वेलरी ब्रॅन्डचे संस्थापक एरॉन शम यांनी याबाबत खुलासा करण्यास नकार दिला की, ही टॉयलेट सीट खरेदी करण्याची कुणाची इच्छा आहे की नाही. त्यांनी सांगितले की, ते हे विकणार नाहीत.

'डेली मेल' सोबत बोलताना एरॉन यांनी सांगितले की, 'आम्ही एक डायमंड आर्ट म्युझिअम करायचं आहे. आम्हाला असं वाटतं की, जास्तीत जास्त लोकांनी हे पहावं आणि त्यांनी आनंद घ्यावा'. सोशल मीडियावर या टॉयलेट सीटवरून वाद पेटला आहे. अनेकजण याचं कौतुक करणार आहे तर अनेकांनी यावर टिका केली आहे. 


Web Title: This solid gold toilet with over 40815 diamonds has taken internet by storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.