७५ वर्षानंतर व्यक्तीने घेतला आईचा शोध, ८ वर्षांचा असताना परिवारापासून झाला होता वेगळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:45 PM2022-04-25T12:45:08+5:302022-04-25T12:47:18+5:30

Jarahatke : ऑस्ट्रेलियात राहत असताना जसा जसा डोरियन मोठा होत गेला त्याला विश्वास बसला की, तो अनाथ आहे. त्याचं बालपण फारच दयनीय स्थितीत गेलं.

Son separated from mother meets family 75 years later hugged cried | ७५ वर्षानंतर व्यक्तीने घेतला आईचा शोध, ८ वर्षांचा असताना परिवारापासून झाला होता वेगळा

७५ वर्षानंतर व्यक्तीने घेतला आईचा शोध, ८ वर्षांचा असताना परिवारापासून झाला होता वेगळा

googlenewsNext

Jarahatke :  एका व्यक्ती ७५ वर्षांनी आपल्या परिवाराला भेटली तर त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. तो ८ वर्षाचा असताना आपल्या परिवारापासून दूर गेला होता. व्यक्तीने हे गृहीत धरलं होतं की, तो अनाथ आहे किंवा त्याच्या आई-वडिलांनी त्याला सोडलं आहे. पण आता तो त्याच्या इतक्यात परिवाराला भेटला. आता या व्यक्तीने तिचा अनुभव सांगितला. 

'मिरर यूके' नुसार, या व्यक्तीचं नाव डोरियन रीस आहे. डोरियनला 'बाल प्रवाशी कार्यक्रम' नावाची योजनेनुसार आठ वयाचा असताना ब्रिटनहून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलं होतं. डोरियन हा त्या हजारो ब्रिटिश मुलांपैकी होता ज्यांना १९४६ ते १९७० दरम्यान हजारो मैल दूर पूर्व ब्रिटनमधील छावण्यात पाठवण्यात आलं होतं. 

ऑस्ट्रेलियात राहत असताना जसा जसा डोरियन मोठा होत गेला त्याला विश्वास बसला की, तो अनाथ आहे. त्याचं बालपण फारच दयनीय स्थितीत गेलं. डोरियनचा सांभाळ करणाऱ्या लोकांना त्याला मारहाणही केली आणि त्याच्यासोबत वाईट वागणूक केली. या सगळ्यातून जात डोरियन आपल्या पायांवर उभा झाला आणि त्याने आपल्या परिवाराचा शोध सुरू ठेवला.

यादरम्यान डोरियन रीसची भेट ब्रिटनमध्ये राहणाऱ्या त्याची भाची ऐनीसोबत झाली. तिच्या मदतीने तो नंतर त्याच्या आईला भेटला. डोरियनला हे माहीत नव्हतं की, त्याचा परिवारा ब्रिटनमध्ये राहतो. पण काही दिवसांपूर्वी तो पत्नी Kay सोबत लंडनला आला होता. इथे त्याने ऐनीच्या मदतीने आपल्या आईचा शोध घेतला. त्याच्या आईचा व्हाइटचॅपल मार्केटमध्ये स्टॉल होता.

स्टॉलवर Kay ने डोरियनला विचारलं की, त्यांना त्यांचा मुलगा कुठे आहे माहीत आहे का? तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा डोरियन त्यांच्यासमोर आला तर दोघेही मिठी मारून खूप रडले. इतक्या वर्षांनी त्यांनी मुलाला पाहिलं होतं. या भेटीनंतर काही दिवसांनीच डोरियनच्या आईचं निधन झालं.

दरम्यान आईच्या माध्यमातून डोरियनला हे समजलं की, त्याच्या दिवंगत वडिलांचं नाव जॉर्ज थॉमस आहे. ज्यांचा जन्म १८९२ मध्ये झाला होता. तर १९८१ मध्ये त्यांचं निधन झालं होतं. जॉर्ज पहिल्या महायुद्धात लढलेही होते. डोरियनच्या जन्माआधीच ते पत्नीपासून वेगळे झाले होते. डोरियनला हेही समजलं की, त्याच्या भाऊ-बहिमणींचा मृत्यू झाला.
 

Web Title: Son separated from mother meets family 75 years later hugged cried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.