२० लाख रुपयांच्या Porn Collection साठी पिता-पुत्रात भांडण, मुलाने ठोकली केस!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:33 PM2019-04-16T13:33:57+5:302019-04-16T13:37:17+5:30
१२ बॉक्स भरुन असलेलं मुलाचं पॉर्न कलेक्शन वडिलांनी केलं नष्ट...
अमेरिकेतील मिशिगनमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका मुलाने वडिलांवर केस केली आहे. मुलाचा आरोप आहे की, त्याच्या वडिलांनी त्याचं पॉर्न सिनेमांचं कलेक्शन खराब केलं. या पॉर्न कलेक्शनची किंमत २९ हजार डॉलर म्हणजे २० लाख रुपये इतकी होती. आता मुलाने भरपाई म्हणूण वडिलांकडे ८६ हजार डॉलर म्हणजेच ५९.५ लाख रुपयांची मागणी केली आहे.
१२ बॉक्स भरुन होत्या फिल्म्स
या घटनेतील दोघांचीही नावे जाहीर केली गेली नाहीयेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१६ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मुलगा त्याच्या आई-वडिलांकडे रहायला आला होता. जेव्हा त्याने त्याचं सगळं सामान घरी मागवलं तेव्हा त्यातील १२ बॉक्स गायब होते. या बॉक्सेसमध्ये पॉर्न सिनेमांच्या कॅसेट्स होत्या.
मुलाने ठोकली केस
याप्रकरणी मुलाने वडिलांविरोधात क्रिमिनल केस करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनाही बोलण्यात आलं. पण वकिलांनी केस घेण्यास नकार दिला. व्यक्तीच्या मुलाने कथित रुपाने हे मान्य केलं होतं की, त्याने हे केलंय. कोर्टात जमा केलेल्या कागदपत्रांनुसार, आरोपी वडिलांनी सांगितले की, 'मी ते पॉर्न सिनेमांचं कलेक्शन नष्ट केलं. पण हे मी मुलाच्या चांगल्यासाठीच केलंय'.
काय म्हणाले वडील?
मुलगा आणि त्याच्या वडिलाची याबाबत कथित रुपाने ई-मेलवर बोलणी झाली होती. यात लिहिले होते की, 'हे मान्य कर किंवा नको करुस पण मी हे तुझ्या मानसिक भावनिक आरोग्यासाठी पॉर्न सिनेमांचं कलेक्शन नष्ट केलं. जर मला एक किलो कोकेन मिळालं तरी मी हेच केलं असतं. मला आशा आहे की, तुला हे कधीतरी कळेल'.
मुलगा काय म्हणाला?
दुसरीकडे मुलगा म्हणाला की, त्याच्या पार्न कलेक्शनमध्ये दुर्मिळ फिल्म्स होत्या. यातील काही अशाही होत्या ज्या आता बाजारात मिळत नाहीत. वडिलांच्या या वागण्याने त्याला दु:खं झालं आहे. आता त्याला कायदेशीर कारवाई करायची आहे.