हृदयस्पर्शी! आईसाठी लेकाची कमाल, ऐकवला मृत्यू झालेल्या वडिलांचा आवाज अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:15 PM2023-12-29T16:15:46+5:302023-12-29T16:29:43+5:30

27 वर्षीय व्यक्तीच्या वडिलांचा 2022 मध्ये कॅन्सरने मृत्यू झाला. त्याची आई या दुःखातून अद्याप सावरू शकलेली नाही. 

son uses ai resurrect late father voice for christmas gift to mother got emotional | हृदयस्पर्शी! आईसाठी लेकाची कमाल, ऐकवला मृत्यू झालेल्या वडिलांचा आवाज अन्...

फोटो - आजतक

ख्रिसमस सर्वत्र आनंदात साजरा केला गेला, परदेशात लोक या सणानिमित्त एकमेकांना सुंदर भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात. एका तरुणाने आपल्या आईला ख्रिसमसचं गिफ्ट म्हणून एक खास गिफ्ट दिलं जे अत्यंत भावूक करणारं होतं. Philip Willett नावाच्या 27 वर्षीय व्यक्तीच्या वडिलांचा 2022 मध्ये कॅन्सरने मृत्यू झाला. त्याची आई या दुःखातून अद्याप सावरू शकलेली नाही. 

अशा परिस्थितीत तरुणाने आईला एक स्पेशल गिफ्ट दिलं. त्याने आईला ख्रिसमसच्या निमित्ताने एक सुंदर कार्ड दिलं जे एक व्हॉईस कार्ड होतं. यामध्ये फिलिपच्या वडिलांच्या आवाजात त्याच्या आईसाठी एक मेसेज होता, जो ऐकून ती भावूक होऊन रडू लागली.

कार्डवर फिलिपची आई ट्रिश आणि वडील जॉन यांचा एक फोटो होता. कार्ड उघडताच आवाज आला - "हाय हनी, आय लव्ह यू. मी तुझी प्रार्थना ऐकतो आणि तुला सांगू इच्छितो की तू आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम आई आहेस." हे ऐकून ट्रिशला अश्रू अनावर झाले. फिलिपने TikTok वर आपल्या आईला दिलेल्या भेटवस्तूशी संबंधित व्हिडीओ शेअर केला. 

आईचा सन्मान करण्यासाठी काहीतरी अनोखं करायचं होतं, म्हणून त्याने AI च्या मदतीने वडिलांना डिजिटली पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्याने एआयच्या मदतीने वडिलांच्या आवाजाशी मिळता जुळता ऑडिओ मेसेज तयार केला आणि नंतर तो कार्डमध्ये टाकून आईला ते गिफ्ट केलं. फिलिपच्या या व्हिडिओवर लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Web Title: son uses ai resurrect late father voice for christmas gift to mother got emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.