मृत आईचा आवाज काढून मुलाने गायब केली वडिलांची पूर्ण कमाई, 60 लाख रूपये लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 02:31 PM2023-07-18T14:31:40+5:302023-07-18T14:32:00+5:30

कमीत कमी 9 वेळा त्याने महिलेच्या आवाजात आणि आपली आई असल्याचं नाटक करत पैसे ट्रांसफर करण्यासाठी फोन केला. मात्र, महिलेचा तर काही महिन्यांआधीच मृत्यू झाला होता.

Son uses dead mother voice to talk father duped him of Rs 60 lakh report | मृत आईचा आवाज काढून मुलाने गायब केली वडिलांची पूर्ण कमाई, 60 लाख रूपये लंपास

मृत आईचा आवाज काढून मुलाने गायब केली वडिलांची पूर्ण कमाई, 60 लाख रूपये लंपास

googlenewsNext

मुलाकडून बापाच्या फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणाने त्याच्या मृत आईच्या आवाजाचा वापर करून वडिलांची आयुष्यभराची कमाई हिसकावून घेतली. तरूणाला अटक करण्यात आली आहे.

द मेट्रोनुसार, 42 वर्षीय डॅनियल कुथबर्ट ने 2017 ते 2018 दरम्यान 14 महिन्याच्या कालावधीत आपल्या वडिलांच्या खात्यातून 56 हजार पाउंड म्हणजे 60, 35, 341 रूपये काढले. त्याने वडिलांचे सगळे पैसे आपल्या खात्यात ट्रांसफर केले.

रिपोर्टनुसार, कमीत कमी 9 वेळा त्याने महिलेच्या आवाजात आणि आपली आई असल्याचं नाटक करत पैसे ट्रांसफर करण्यासाठी फोन केला. मात्र, महिलेचा तर काही महिन्यांआधीच मृत्यू झाला होता. कोर्टाने सांगितलं की, कुथबर्टने आपल्या वडिलांच्या खात्यातन एकूण 8 हजार पाउंड आपल्या खात्यात ट्रांसफर करण्यासाठी मृत आईच्या आवाजात स्वत:च आठ वेळा फोन केला.

कथबर्ट जो आधी स्टॅनिनय नॉर्थ हेम्पटनशायरचे रहिवाशी होता. त्यानेही आपल्या वडिलांच्या नावावर  कर्ज घेतलं होतं. या कर्जामुळे त्याना आपलं घर सोडावं लागलं होतं.

स्काई न्यूजनुसार, पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या ऑडिओतून समजलं की, कशाप्रकारे कथबर्टने आपल्या आईचं रूप धारण केलं आणि लॉयड्स बॅंकेच्या हॅंडलरला हा विश्वास दिला की, तो श्रीमती कथबर्ट आहे.

एका कॉलवर त्याला लगेच पैसे मिळवण्याआधी सुरक्षा प्रश्नांची उत्तर देताना ऐकण्यात आलं. कथबर्टने 2017 यांना आपल्या खात्यावर संशयास्पद हालचाल दिसली आणि आपल्या मुलाला याबाबत विचारलं तर त्याने मी काहीच केलेलं नाही असं सांगितलं. पण त्याला सत्य सांगावच लागलं. बिल्डींग सोसायटीने त्याना 2018 मध्ये सांगितलं की, पैसे नसल्याने त्याना आपलं घर सोडावं लागेल.

Web Title: Son uses dead mother voice to talk father duped him of Rs 60 lakh report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.