ज्या मुलाचा करण्यात आला होता अंत्यसंस्कार, तो 7 वर्षांनी जिवंत घरी आला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 04:56 PM2023-08-01T16:56:59+5:302023-08-01T16:58:42+5:30
सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.
बिहारच्या पटणामधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील आसोपूर गावात एक वृद्ध दाम्पत्य राहतात. सात वर्षाआधी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाला मृत समजून त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार केला होता. पण सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये आसोपूर येथील बृजनंदन राय आणि पियरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय अचानक बेपत्ता झाला होता. आई-वडिलांनी आपल्या मुलाचा खूप शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. त्याच्या वडिलांनी अंधविश्वासाच्या नादात त्याचा पुतळा बनवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केला.
मात्र 7 वर्षानंतर त्याना आनंदाचा धक्का बसला. त्यांना मुलगा बिहारी राय दिल्लीतील एक संस्था आणि एका सरपंचाच्या माध्यमातून घरी परत आला. मुलगा घरी परत आल्याचा आनंद आई-वडिलांच्या डोळ्यात दिसत होता. त्याला बघताच त्यांनी मिठी मारली.
वडील बृजनंदन राय म्हणाले की, मुलगा बेपत्ता झाल्यावर अनेकदा तो त्यांना स्वप्नात दिसत होता. एकदा स्वप्नात मुलगा स्वत: म्हणाला होता की, तो जिवंत आहे. ज्यानंतर त्यांनी काही साधूंशी चर्चा केली. साधू म्हणाले की, तुमचा मुलगा मृत झाला आहे. आता त्याची आत्मा तुम्हाला त्रास देत आहे. ज्यामुळे त्यांनी पुतळा बनवून त्याला मुलगा मानून अंत्यसंस्कार केला.
वडील काही लोकांच्या बोलण्यात आले होते. पण काही दिवसांआधी गावातील सरपंचाच्या मोबाइलवर दिल्लीतील एक संस्थेने बिहारी जिवंत असल्याचं सांगितलं आणि त्याचे फोटो पाठवले.
बिहारीची ओळख पटवल्यावर सरपंचांनी याची माहिती त्याच्या परिवाराला दिली. 7 वर्षानी जेव्हा बिहारी घरी परत आला तेव्हा परिवारात आनंद पसरला. बिहारी हा मानसिक आजारी आहे. त्यामुळे त्यालाच माहीत नव्हतं की, तो घरातून कधी आणि कसा निघून गेला होता.