ध्वनी यात्रा! जोडप्याच्या रोमान्सच्या आवाजाने हैरान झाला शेजारी; एक दिवस त्यांच्या दरवाजावर चिठ्ठी लिहिली...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:39 PM2021-05-17T16:39:55+5:302021-05-17T16:42:35+5:30
Couple Romance sound travel to neighbor : मला आधी वाटले की कोणत्यातरी जवळच्या व्यक्तीने माझी मस्करी केली आहे. मी हा किस्सा माझ्या मित्रांना सांगितला तेव्हा त्यांनी मला शेजाऱ्यांना इअरप्लग खरेदी करण्याचा सल्ला देण्यास सांगितले आहे. ही चिठ्ठी कोणी लिहिली ते मला जाणूननही घ्यायचे नाही. हे मी इमानदारीने सांगत आहे, असे तो तरुण म्हणाला.
एक व्यक्ती शेजाऱ्याच्या रोमान्स (Couple Roamnce) करतानाच्या आवाजाने खूपच त्रस्त झाला होता. एवढा की त्याने दरवाजावर एक तक्रार करणारी चिठ्ठी लिहिली. हे प्रकरण स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरातील आहे. शेजाऱ्याने या जोडप्याला दिलेला सल्ला त्या जोडप्य़ाला लाजेने मान खाली घालायला लावणारा आहे. (Your Romance sound travelling, please keep silence; neighbor wrote note on Door.)
ही चिठ्ठी 26 वर्षांच्या स्टीपन कनिंघम याच्या फ्लॅटबाहेरच्या दरवाजावर चिकटविण्यात आली होती. एका अज्ञात शेजाऱ्याने (नाव समजू शकले नाही) खूपच सौम्य भाषेत आणि विनम्रतेने 'ध्वनी प्रवास' करतो असे लिहिले होते. स्टीफनने सांगितले की, मी सकाळी उठलो तेव्हा मला दरवाजावर एक अज्ञात शेजाऱ्याने लिहिलेली चिठ्ठी चिकटवलेली दिसली. मला ती चिठ्ठी पाहून हसावे की रडावे तेच कळेना. मी चिठ्ठी वाचत वाचत फरशीवरच कलंडलो.
मला आधी वाटले की कोणत्यातरी जवळच्या व्यक्तीने माझी मस्करी केली आहे. मी हा किस्सा माझ्या मित्रांना सांगितला तेव्हा त्यांनी मला शेजाऱ्यांना इअरप्लग खरेदी करण्याचा सल्ला देण्यास सांगितले आहे. ही चिठ्ठी कोणी लिहिली ते मला जाणूननही घ्यायचे नाही. हे मी इमानदारीने सांगत आहे.
चिठ्ठीत काय लिहिलेले...
''प्रिय शेजारी, माझ्या शेजाऱ्याला काही लक्षात आणून देण्यासाठी मी दोस्ताना चिठ्ठी लिहित आहे. या इमारतीच्या भिंती पातळ आहेत आणि आवाज त्यातून प्रवास करू शकतो. आम्ही तुम्हाला याची कल्पना करून देत आहोत, आम्हाला जेवढे ऐकायला येत आहे त्यापेक्षा जास्त आम्ही ऐकत आहोत. तुमच्या चार दरवाजांमधील खास आणि खासगी क्षणांना आमच्यासोबत सार्वजनिक करू नका.'' असे लिहिले आहे.
आम्ही तुम्ह्माला यासाठी विनम्रतेने विचारत आहोत, की तुम्ही रात्री थोडा कमी आवाज करू शकता का. कृपया लक्षात ठेवा, काळजी घ्या, कारण तुमच्या शेजारच्यांच्या घरात तुमचा ध्वनी प्रवास करतोय, असे पुढे लिहिले होते.