शिकारीसाठी गेलेल्या व्यक्तीची प्राण्यांनीच केली शिकार, हत्तीने चिरडले तर वाघाने खाल्ले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 04:10 PM2019-04-08T16:10:28+5:302019-04-08T16:14:47+5:30
दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर नॅशनल पार्कमध्ये एका व्यक्ती बेकायदेशीर पद्धतीने शिकार करण्यासाठी गेली होती.
(Image Credit : www.nytimes.com)
दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर नॅशनल पार्कमध्ये एका व्यक्ती बेकायदेशीर पद्धतीने शिकार करण्यासाठी गेली होती. पण त्याला शिकारीला जाणं चांगलंच महागात पडलं आहे. इतकं की, तो शिकारीला गेला आणि त्याचीच शिकार झाली. रिपोर्टनुसार, या व्यक्तीला हत्तीने चिरडले आणि त्यानंतर वाघांनी त्याला खाल्लं. मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या एका साथीदाराने याची माहिती त्याच्या घरी दिली. त्याने सांगितले की, २ एप्रिलला हत्तीने त्याला चिरडले होते, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
शिकारीच्या परिवाराने जेव्हा पार्कच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली तेव्हा काही जवान त्यांच्या शोधासाठी जंगलात गेले होते. दोन दिवसांच्या शोधा मोहिमेनंतर कर्मचाऱ्यांना पार्कमध्ये एक मनुष्याची कवटी आणि पायजाम्याची जोडी मिळाली. हे त्या शिकारीचे असल्याचे सांगितले जात आहे.
#sapsMP Komatipoort: A human skull found in the Kruger National Park (KNP) is believed to be that of a man reportedly killed by an elephant while poaching with his accomplices on 01/04; duo arrested, rifles & ammo seized. MEhttps://t.co/XXsXpJqTjApic.twitter.com/4Oye38Eddh
— SA Police Service (@SAPoliceService) April 6, 2019
पोलिसांनी सांगितले की, क्रूगन नॅशनल पार्कमध्ये बेकायदेशीरपण प्रवेश करण्याचा निर्णय योग्य नव्हता. ही घटना याचा पुरावा आहे की, अशाप्रकारे काही करणं किती घातक आहे. रिपोर्ट्सनुसार, क्रूगर नॅशनल पार्कमध्ये बेकायदेशीरपणे शिकारीच्या घटना होत असतात. आशियाई देशात गेंड्याच्या शिंगाला फार मागणी आहे. याच कारणामुळे शिकारी त्यांच्या शिकारीसाठी जंगलात येत असतात.