धक्कादायक! फिरायला नेलेल्या सिंहांनीच केला अंकल वेस्ट यांच्यावर हल्ला, जागेवरच मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 12:57 PM2020-08-28T12:57:39+5:302020-08-28T13:07:37+5:30
वेस्ट यांच्या पत्नीने सांगितले की, ती पती आणि सिंहाच्या मागे कारने येत होती. आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांनी सिंहांचं लक्ष भरकटवण्यासाठी खूप प्रयत्न केले.
दक्षिण आफ्रिकेतील एका पर्यावरण संरक्षणवादी व्यक्तीचा मृत्यूला सिंहांना फिरायला घेऊन जाताना झाला. प्रसिद्ध संरक्षणवादी वेस्ट मॅज्यूसन यांच्यावर दोन पांढऱ्या सिंहांनी हल्ला केला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वेस्ट यांच्या पत्नीने सांगितले की, ती पती आणि सिंहाच्या मागे कारने येत होती. आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांनी सिंहांचं लक्ष भरकटवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. वेस्ट हे दक्षिण आफ्रिकेतील लिम्पोपो प्रांतात एक सफारी लॉज 'लॉयन ट्री टॉप लॉज' नावाने चालवत होते.
सिंहीणीला या घटनेनंतर एका दुसऱ्या गेम लॉजमध्ये नेण्यात आलं आहे आणि अशी आशा केली जात आहे की, नंतर तिचा व्यवहार पाहून तिला जंगलात सोडून दिलं जाईल. ही सिंहीणीचं एका सिंहासोबत भांडण झालं आणि अचानक ती वेस्ट मॅज्यूसन यांच्याकडे वळली आणि त्यांच्यावर हल्ला केला. लोक वेस्ट यांना 'अंकल वेस्ट' नावाने ओळखायचे.
वेस्ट यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, बुधवारी एका वाईट घटनेत त्यांचं निधन झालं. ज्या सिंहीणीने त्यांच्यावर हल्ला केला तिला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
वेस्ट मॅज्यूसन यांच्याबाबत सांगितलं जातं की, त्यांनी वाघांना डब्बाबंद शिकारीपासून वाचवलं होतं. डब्बाबंद शिकारीत जनावरांची एका संलग्न क्षेत्रात शिकार केली जाते किंवा त्यांना शिकार करण्यासाठी बंद केलं जात होतं. या सिंहीणीबाबत सांगितले जाते की, २०१७ मध्ये वेस्ट लॉजजवळील प्रॉपर्टीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीवर हल्ला करून त्याचा जीव घेतला होता.
हे पण वाचा :
गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून दाढी, मिशी काळी करत असाल तर सावधान! आधी हे वाचा
Video : ....अन् भर रस्त्यात महिलेनं वॉचमनला चपलेनं चांगलाच चोप दिला; व्हिडीओ व्हायरल
'हंबरून वासराले चाटती जवा गाय', गाडीखाली सापडलेल्या वासराला लोकांनी वाचविले अन्...