महिलेने टॉयलेट पेपरपासून तयार केला वेडिंग ड्रेस, स्पर्धेत इतक्या लाखांचं मिळालं बक्षिस!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 02:40 PM2019-10-08T14:40:48+5:302019-10-08T14:45:44+5:30
जगात वेगवेगळ्या आश्चर्यकारक आणि विचित्र स्पर्धा नेहमीच आयोजित केल्या जातात. कुठे एकमेकांना कानशिलात लगावण्याची स्पर्धा तर कुठे हाय हील्स सॅंडल घालून महिलांची धावण्याची स्पर्धा.
(Image Credit : CCTV)
जगात वेगवेगळ्या आश्चर्यकारक आणि विचित्र स्पर्धा नेहमीच आयोजित केल्या जातात. कुठे एकमेकांना कानशिलात लगावण्याची स्पर्धा तर कुठे हाय हील्स सॅंडल घालून महिलांची धावण्याची स्पर्धा. अशीच एक अजब स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आली होती. ज्यात टॉयलेट पेपरपासून वेडिंग ड्रेस तयार करायचा होता.
(Image Credit : CCTV)
सुरूवातीला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी एकूण १५०० स्पर्धकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. पण ३० सप्टेंबरला या स्पर्धेची अंतिम फेरी झाली. ज्यात १० स्पर्धकांची निवड झाली होती. त्यातून दक्षिण कॅरोलिनातील मिमोजा हास्काला विजयी घोषित करण्यात आले.
(Image Credit : CCTV)
या स्पर्धेत वेडिंग ड्रेस तयार करण्यासाठी टॉयलेट पेपरसोबतच टेप, धागा आणि ग्लूचा वापर करण्यात आला. मिमोजा हास्काने एकूण ४८ रोल टॉयलेट पेपरचा वापर करून वेडिंग ड्रेस तयार केला. हा ड्रेस सर्वात चांगला घोषित करण्यात आला. हा वेडिंग ड्रेस तयार करण्यासाठी मिमोजाला एकूण ४०० तास इतका वेळ लागला.
(Image Credit : CCTV)
मिमोजा हास्काला ही स्पर्धा जिंकल्यावर एकूण सात लाख रूपये बक्षिस दिलं गेलं. या स्पर्धेत परिक्षक म्हणून अनेक प्रसिद्ध लोक उपस्थित होते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य होईल की, या स्पर्धेचं प्रसारण अमेरिकेतील नॅशनल टीव्हीवर देखील करण्यात आलं होतं.