लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 09:48 AM2020-08-03T09:48:38+5:302020-08-03T09:54:56+5:30

आता तुम्ही एखाद्या अनोळखी देशात अडकून पडता तेव्हा किती अडचणी येऊ शकतात याची कल्पना करू शकता. पण Tresna Soraino साठी ही स्थिती जणू वरदानच ठरली.

Spanish woman stuck in India since lockdown learnt farming and southern language | लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा!

लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा!

googlenewsNext

(Image Credit : timesofindia.indiatimes.com)

कोरोना व्हायरसमुळे जेव्हा लॉकडाऊन लागू झाला, त्यावेळी देशात अनेक परदेशी लोकही अडकले. असंच काहीसं Tresna Soraino नावाच्या महिलेसोबत झालं. ती मार्च महिन्यात भारतात आली होती. पण लॉकडाऊनमुळे ती भारतातच अडकून पडली. आता तुम्ही एखाद्या अनोळखी देशात अडकून पडता तेव्हा किती अडचणी येऊ शकतात याची कल्पना करू शकता. पण Tresna Soraino साठी ही स्थिती जणू वरदानच ठरली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, Tresna स्पेनच्या Valencia शहरात राहणारी आहे. ती एक इंडस्ट्रिअल डिझायनर आहे. लॉकडाऊननंतर ती कर्नाटकातील उडुपीमध्ये अडकली. मात्र, दरम्यान ती थोडी थोडी कन्नड भाषा बोलू लागली. तिने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ती उडुपीच्या कुन्दापूर तालुक्यात एका मित्रांकडे थांबली होती. तिला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की, शहराऐवजी गावात थांबली. ती इथे सुरक्षित तर होतीच सोबतच तिला येथील लोकही आवडले.

गेल्या चार महिन्याचा तिने चांगलाच फायदा करून घेतला. चार महिन्यात ती केवळ भाषाच शिकली नाही तर शेतीची कामेही शिकली. ती इथे पिकाची कापणी करणे, रांगोळी काढणे, झाडू तयार करणे अशा अनेक गोष्टी शिकली. टेन्शन घेत बसण्यापेक्षा ज्या देशात आपण अडकलो त्या देशातील संस्कृतीची एकरूप होण्याचा फार चांगला फायदा तिने करून घेतला.

Tresna ने भारतात येण्याचा निर्णय तिचा भाऊ आणि ऑफिसमधील एका सहकाऱ्याच्या सांगण्यावरून घेतला होता. तिच्या ऑफिसमधील मित्र याच गावात राहणारा आहे आणि त्याच्या घरी ती थांबली आहे. ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत आधी भारत आणि नंतर श्रीलंका फिरण्याचा प्लॅन करून आली होती. पण तिचा बॉयफ्रेन्ड मुंबई एअरपोर्टवरून स्पेनला गेला आणि ती इथेच राहिली. आता तिला परत जाण्याआधी एकदा गोव्याला फिरायचं आहे.

हे पण वाचा :

ऐकावे ते नवलंच! ....म्हणून 'ही' डॉक्टर नेहमी बिकनी घालून करते रुग्णाचे उपचार, पाहा फोटो

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

Web Title: Spanish woman stuck in India since lockdown learnt farming and southern language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.