८ लाख रुपये अन् फ्लाइटची तिकिटे; महिला बॉसनं दिला सरप्राइज बोनस, कर्मचारी भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 11:46 AM2023-04-04T11:46:29+5:302023-04-04T11:46:58+5:30
साराने प्रत्येक कर्मचाऱ्याला फ्लाईटचे २ तिकीट दिले असून ते जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरू शकतात असं म्हटलं आहे
नवी दिल्ली - एका महिला बॉसने तिच्या सर्व कर्मचाऱ्यांना जवळपास ८ लाख रुपये आणि २ फर्स्ट क्लास फ्लाइट तिकीट थँक्यू बोनस अंतर्गत दिले. बॉसनं दाखवलेल्या दानशूर वृत्तीमुळे जगातील बेस्ट बॉस म्हणून कर्मचारी त्यांचे कौतुक करत आहेत. इतकेच नाही तर ज्यावेळी कर्मचाऱ्यांना हा थँक्यू बोनस दिला जाणार आहे याची कल्पना कुणालाही नव्हती. जेव्हा बॉसने घोषणा केली तेव्हा अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि भावूक झाल्याचं दिसून आले.
या महिला बॉसचं नाव सारा ब्लॅकले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या साराने अलीकडेच तिच्या कर्मचाऱ्यांना हे सरप्राइज गिफ्ट दिले. कारण सारा यांची स्पांक्स(Spanx) कंपनी ९ हजार कोटीहून अधिक मूल्य असलेली कंपनी बनली आहे. साराने या कंपनीची सुरुवात ४ लाख रुपयांपासून केली होती. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ सारा एका पार्टीत एन्जॉय करताना दिसते. ती कर्मचाऱ्यांशी संवाद साधत होती. या संवादावेळी साराने तिच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी थँक्यू बोनसची धमाकेदार घोषणा केली. त्यात रुपयांसह कर्मचाऱ्यांना फ्लाईट तिकीटही दिले.
साराने प्रत्येक कर्मचाऱ्याला फ्लाईटचे २ तिकीट दिले असून ते जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरू शकतात असं म्हटलं आहे. साराची घोषणा ऐकून अनेक कर्मचारी भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. काहींच्या डोळ्यातून अश्रू आले. जेव्हा तुम्ही फिरायला जाल, तेव्हा चांगले जेवण आणि उत्तम हॉटेलही असायला हवं. त्यासाठी तिकीटासोबतच तुम्हाला प्रत्येकी १० हजार डॉलर म्हणजे (८ लाख) देण्यात येतील असंही साराने कर्मचाऱ्यांना सांगितले.
बेस्ट बॉस सारा ब्लॅकले कोन आहे?
सारा ब्लॅकले (Sara Blakely) फोर्ब्सच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण ७ हजार ९७८ कोटीहून अधिक संपत्ती आहे. साराचा ब्रँड Spanx हा जगातील ५० हून अधिक देशात अंडरगार्मेंटस, लेगिंग्स, स्विमवियर आणि मॅटरनिटी वियर कपडे विक्री करतो. सारा ही अमेरिकेत राहणारी असून तिचे पती जेसी इट्जर प्रायव्हेट जेट मेंबरशिप कंपनी मारक्विस जेट्सचे संस्थापक आहेत. ज्यांनी २०१० मध्ये पदभार स्वीकारला होता.