अंधारात चमकणारे बेडूक
By Admin | Published: May 2, 2017 12:39 AM2017-05-02T00:39:29+5:302017-05-02T00:39:29+5:30
शास्त्रज्ञांनी अंधारात चमकणाऱ्या बेडकाच्या एका प्रजातीचा शोध लावला आहे. दक्षिण अमेरिकेच्या अर्जेंटिनामध्ये
शास्त्रज्ञांनी अंधारात चमकणाऱ्या बेडकाच्या एका प्रजातीचा शोध लावला आहे. दक्षिण अमेरिकेच्या अर्जेंटिनामध्ये हे आगळेवेगळे बेडूक आढळले. त्याच्या पाठीवर हिरवे, पिवळे आणि लाल रंगाचे ठिपके आहेत. सामान्य प्रकाशात ते पोल्का डॉटस्प्रमाणे दिसतात. परंतु अंधारात मात्र गडद निळ्या आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशात चमकतात. संशोधकांनी परावर्तित किरणयुक्त फ्लॅशलाईटने प्रकाश टाकला तेव्हा लालऐवजी त्याच्या आतून गडद हिरव्या आणि निळ्या रंगाचा प्रकाश परावर्तित होऊ लागला. या बेडकांचा अधिवास बहुदा झाडांवरच असतो. ही बेडके इतर कुठल्याही प्राण्यांच्या तुलनेत एकदम वेगळ्या प्रकारे परावर्तन प्रक्रियेचा वापर करतात.