तज्ज्ञांनी असं मोबाइल अॅप विकसित केलं आहे, ज्यामुळे घेता येतो परफेक्ट सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 12:32 PM2017-08-03T12:32:59+5:302017-08-21T16:50:42+5:30

संगणक तज्ज्ञांनी एक असं स्मार्टफोन अॅप विकसीत केलं आहे ज्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला परफेक्ट सेल्फी काढण्याची कला शिकता येणार आहे.

Special apps designed for perfect selfie | तज्ज्ञांनी असं मोबाइल अॅप विकसित केलं आहे, ज्यामुळे घेता येतो परफेक्ट सेल्फी

तज्ज्ञांनी असं मोबाइल अॅप विकसित केलं आहे, ज्यामुळे घेता येतो परफेक्ट सेल्फी

Next
ठळक मुद्दे संगणक तज्ज्ञांनी एक असं स्मार्टफोन अॅप विकसीत केलं आहे ज्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला परफेक्ट सेल्फी काढण्याची कला शिकता येणार आहे.कोणत्या अँगलमध्ये मोबाईलचा कॅमेरा पकडला की बेस्ट सेल्फी मिळेल हे व्यक्तीला सहज समजेल, अशा प्रकारचं या अॅपचं अल्गोरिथम आहे. कॅनडाच्या वॉटरलू युनिव्हर्सिटीतील संगणक शास्त्रज्ञांनी हे नवं अॅप तयार केलं आहे.

वॉटरलू, दि. 3- सध्या कधीही आणि कुठेही सेल्फी काढायची पद्धतच आहे. पण बरेच सेल्फी काढल्यानंतरही मनासारखा फोटो काढता येत नाही. पण ज्यांना सेल्फी काढायला आवडतं पण परफेक्ट सेल्फी काढला येत नाही, अशा लोकांसाठी आता एक खास मोबाईल अॅप तयार करण्यात आलं आहे. संगणक तज्ज्ञांनी एक असं स्मार्टफोन अॅप विकसीत केलं आहे ज्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला परफेक्ट सेल्फी काढण्याची कला शिकता येणार आहे. कोणत्या अँगलमध्ये मोबाईलचा कॅमेरा पकडला की बेस्ट सेल्फी मिळेल हे व्यक्तीला सहज समजेल, अशा प्रकारचं या अॅपचं अल्गोरिथम आहे. कॅनडाच्या वॉटरलू युनिव्हर्सिटीतील संगणक शास्त्रज्ञांनी हे नवं अॅप तयार केलं आहे. सेल्फी एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये लोक स्वतःला तसंच स्वतःच्या अनुभवांना व्यक्त करत असतात. फक्त फरक इतकाच की प्रत्येक सेल्फी सारखा नसतो, असं कॅनडाच्या वॉटरलू युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॅन वोगल म्हणाले आहेत. 

इतर अॅप्लिकेशनमध्ये सेल्फी काढल्यानंतर तो नीट करण्याचं फीचर असतं. पण या अॅपमध्ये सिस्टम युजरला सेल्फी कसा चांगला येईल, याबद्दलची दिशा दाखविणार आहे, असंही वोगल यांनी सांगितलं. 
अॅपचं अल्गोरिदम डेव्हलप करताना वोगल आणि वॉटरलू युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी किफान ली यांनी सामान्य दिसणाऱ्या लोकांचं थ्री डी स्कॅनिंग घेतलं होतं. या दोघांनी शेकडो वर्चुअल स्मार्टफोन कॅमेरा आणि कॉम्युटर लाइटिंगचे कोड लिहून अनेक वर्चुअल सेल्फी काढल्या.याचा उपयोग त्यांना अॅप विकसीत करताना झाला. याच्याच माध्यमातून सेल्फी काढताना चेहरा कसा ठेवावा, लाइटची दिशा कशी असावी, या गोष्टी ठरविण्यात आल्या. 

एका ऑनलाइन क्राउडसोर्सिंग सर्व्हिसचा वापर करून, वोगल आणि किफान ली यांनी हजारो लोकांचं मत नोंदवून घेतलं. आणि त्यांच्या अॅपमधून काढलेल्या फोटो पैकी कोणता वर्चुअल सेल्फी फोटो बेस्ट आहे त्याची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी मतांच्या आधारे नवं अल्गोरिदम बनवलं ज्यामुळे लोकांना सगळ्यात उत्तम सेल्फी काढता येतील. यानंतर त्यांनी लोकांना त्यांच्या मोबाईलमधील कॅमेऱ्यातून सेल्फी काढालया लावली तसंच अल्गोरिथमच्या कॅमेरा अॅपमधून सेल्फी काढायला लावली. दोन्ही सेल्फी काढल्यानंतर ऑनलाइन रेटिंगमधून नव्या अॅपमधून काढलेल्या सेल्फी 26 टक्क्याने चांगल्या आल्या.
इडनबर्गमध्ये झालेल्या डिझायनिंग इंटरॅक्टीव्ह सिस्टमच्या सर्वसाधारण सभेत वोगन आणि किफान ली यांनी त्यांचं काम सादर केलं. 
 

Web Title: Special apps designed for perfect selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.