अरे देवा! खात्यात चुकून आलेले ८१ कोटी रुपये ‘उडवणे’ महागात पडले! पैसे परत करा; कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:08 AM2022-10-06T11:08:35+5:302022-10-06T11:09:16+5:30

नेमका काय घडला प्रकार? कोट्यवधी रुपये कुठे कुठे खर्च केलेत? तुम्हीच पाहा...

spending 81 crore rupees that were mistakenly in the account became expensive the court orders to return the money | अरे देवा! खात्यात चुकून आलेले ८१ कोटी रुपये ‘उडवणे’ महागात पडले! पैसे परत करा; कोर्टाचे आदेश

अरे देवा! खात्यात चुकून आलेले ८१ कोटी रुपये ‘उडवणे’ महागात पडले! पैसे परत करा; कोर्टाचे आदेश

Next

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहणाऱ्या थेवामनोगरी मॅनिवेल या महिलेच्या खात्यात अचानक तब्बल ८१ कोटी रुपये आले. इतके पैसे बघून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. चुकून खात्यात आलेल्या पैशांतून तिने ११ कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केले. उर्वरीत पैसे मुलगी, बहिणीसह सहा जणांमध्ये वाटून घेतले. खरेतर सिंगापूरमधील एका क्रिप्टो कंपनीकडून महिलेला आठ हजार रुपये मिळणार होते. 

सुमारे सात महिन्यांनंतर ऑडिट झाल्यावर कंपनीला चूक समजली. कंपनीने महिलेशी संपर्क साधला; पण, तिने दुर्लक्ष केले. आता कंपनीने न्यायालयात खटला दाखल केला असून कोर्टाने महिलेसह जतिंदर सिंग नावाच्या व्यक्तीला दोषी ठरवले, तो त्या सहा लोकांपैकी होता ज्यांना महिलेने पैसे वाटले. आता तिला घर विकून सर्व पैसे परत करावे लागतील, असे कोर्टाने म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: spending 81 crore rupees that were mistakenly in the account became expensive the court orders to return the money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.