Sperm Donor वडिलांनी ५०० वेळा विकले स्पर्म, सावत्र बहीण-भावांमुळे तरूणाचे डेटींगचे वांदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:12 AM2021-02-16T10:12:36+5:302021-02-16T10:25:59+5:30

Zave Fors या स्थितीला त्याच्या सीरीअल स्पर्म डोनर (Sperm Doner) वडिलांना जबाबदार मानतो. रिपोर्टनुसार गेल्या काही वर्षात Zave Fors ला त्याचे ८ भाऊ-बहीण शोधण्यात यश मिळालं आहे.

Sperm donor father sold sperm 500 times in 10 years | Sperm Donor वडिलांनी ५०० वेळा विकले स्पर्म, सावत्र बहीण-भावांमुळे तरूणाचे डेटींगचे वांदे...

Sperm Donor वडिलांनी ५०० वेळा विकले स्पर्म, सावत्र बहीण-भावांमुळे तरूणाचे डेटींगचे वांदे...

Next

अमेरिकेतील Oregon प्रांतात राहणाऱ्या २४ वर्षीय Zave Fors साठी एक डेटींग अ‍ॅप एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण त्याला यावर त्याचे हरवलेले भाऊ-बहीण भेटतात. आता तो या डेटींग अ‍ॅपला(Dating App) इतका कंटाळला आहे की, त्याकडे त्याला बघायचं पण नाहीये. 

८ भाऊ-बहिणींना शोधलं

Zave Fors या स्थितीला त्याच्या सीरीअल स्पर्म डोनर (Sperm Donor) वडिलांना जबाबदार मानतो. रिपोर्टनुसार गेल्या काही वर्षात Zave Fors ला त्याचे ८ भाऊ-बहीण शोधण्यात यश मिळालं आहे. असं असलं तरी त्याला हे माहीत नाही की, मूळात त्याचे किती भाऊ-बहीण आणखी असू शकतात. त्याला भीती आहे की, चुकून तो डेटींग करत त्यातीलच एकासोबत रिेलेशन ठेवेल. (हे पण वाचा : २३ व्या वर्षी 'ती' आहे ११ बाळांची आई; आता तिला शतक करण्याची घाई )

डेटींग अ‍ॅप उघडताच सापडले सावत्र भाऊ-बहीण

द मिररच्या रिपोर्टनुसार, Zave Fors म्हणाला की, 'न जाणे कितीतरी भाऊ-बहिणींनी माझ्या डेटींग लाइफला नुकसान पोहोचवलं आहे. जेव्हा मी टींडरवर स्वाइप करतो तेव्हा मला हे खरंच माहीत नसतं की, माझ्याशी संबंधित कुणी आहे किंवा नाही. मी डेटींग अ‍ॅपवर भेटलेल्या व्यक्तीची जेनेटिक टेस्ट नाही करवू शकत. त्यामुळे ती व्यक्ती माझ्याशी संबंधित आहे की, नाही हे समजत नाही'. (हे पण वाचा : आश्चर्यकारक! फक्त स्तनांमधून नाही तर काखेतूनही बाहेर येऊ शकतं दूध; महिलेनं शेअर केला व्हिडीओ)

सतत मनात येते शंका

Zave Fors म्हणाला की, 'अनेक लोक सांगतात की, अशा केसेसमध्ये अचानक भेटण्याची शक्यता फार कमी असते. पण सत्य हे आहे की, मी नकळत माझ्या सावत्र भावासोबत शाळेत गेलो होतो. तो शाळेत माझ्यापेक्षा २ वर्ग पुढे होता. त्यामुळे भलेही लोक म्हणत असतील की, अचानक भेटण्याची शक्यता कमी असते. तरी सुद्धा त्याला सतत शंका येत राहते'. Zave Fors म्हणाला की, माझ्या बहीण-भावांचेही अनुभव असेच होते. 

वडिलांनी ५०० पेक्षा जास्त वेळ केलं स्पर्म डोनेशन

बालपणी Zave Fors ला जेव्हा समजलं की, त्याचे जैविक वडील दुसरे कुणीतरी आहे तर तो त्यांच्या शोधात होता. सोबत आपल्या जैविक भाऊ-बहिणींनाही त्याने शोधण्याचा निर्णय घेतला. यात Zave Fors ला यशही मिळालं. त्याने Ancestry.com च्या मदतीने हे जाणून घेतलं की, त्याच्या जैविक वडिलांनी १० वर्ष आपले शुक्राणू ५०० पेक्षा जास्त वेळा विकले. द मिररच्या रिपोर्टनुसार, त्याच्या वडिलांचे ५० पेक्षा जास्त अपत्य आहेत.

Web Title: Sperm donor father sold sperm 500 times in 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.