Viral Video: असली नकली मधला फरक ओळखा; या Statues मधील खरा कुत्रा शोधून दाखवा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 04:25 PM2020-08-11T16:25:24+5:302020-08-11T16:27:01+5:30
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ८ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या कुत्र्याने स्टॅच्यू बनण्यासाठी जबरदस्त अॅक्टिंग केली आहे. त्याला पाहून तुम्ही देखील म्हणाल की हा एक स्टॅच्यूच आहे. मात्र, हा व्हिडिओ प्ले केल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
जपानी शिल्पकार मिओ हाशिमोटो (Mio Hashimoto) यांनी आपला पाळीव कुत्रा त्सुकी (Tsuki)चा हा व्हिडीओ शनिवारी शेअर केला आहे, ज्यामध्ये तो इतर स्टॅच्यूजवळ जाऊन स्टॅच्यूसारखा शांत उभा आहे.
また彫刻と化していた pic.twitter.com/ZsC0pxBOPu
— はしもとみお (@hashimotomio) August 8, 2020
हाशिमोटो यांनी ट्विटर फॉलोअर्सना आपल्या कार्यक्षेत्राची झलक दाखविली आहे. त्यामध्ये मांजरी, कुत्रे, ससा यांचे स्टॅच्यू खांद्याला खांदा लावून उभे करण्यात आले आहेत. या लाकडी प्रतिकृतींमध्ये त्सुकी सुद्धा उभा होता. तो इतका शांत उभा होता की पहिल्या नजरेत पाहिले तर तो खरा कुत्रा आहे, ते समजत नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ८ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ५ लाखांहून अधिक लाईक्स आणि एक लाखाहून अधिक री-ट्वीट करण्यात आले आहेत. अनेक जण या कुत्र्याचे खूप कौतुक करीत आहेत. तसेच, बऱ्याच लोकांनी या शिल्पकाराचे कौतुकही केले.
एका युजरने लिहिले की, 'स्टॅच्यू किती वास्तविक असल्याचे वाटत आहेत. मी ओळखले नाही की कोणता नकली आहे'. त्याचवेळी दुसर्या युजरने लिहिले, 'तुम्ही खरोखरच एक चांगले काम केले आहे. स्टॅच्यू खूप सुंदर दिसतात.'