लग्नपत्रिकेवर सरकारी योजनांचा प्रसार
By admin | Published: May 30, 2017 01:12 AM2017-05-30T01:12:33+5:302017-05-30T01:12:33+5:30
राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील एका लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सामान्यत: अन्य लग्नपत्रिकांप्रमाणेच
जयपूर : राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील एका लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सामान्यत: अन्य लग्नपत्रिकांप्रमाणेच डिझाईन असलेल्या पत्रिकेवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आणि केंद्र सरकारच्या काही योजनांची घोषवाक्ये छापली आहेत. त्यामुळे ही पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पुरीलाल आणि पद्मा यांच्या लग्नाची ही पत्रिका आहे. २९ एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले. लग्नपत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानांची घोषवाक्ये छापण्याची कल्पना वराचे काका रामविलास मीना यांना सुचली. उत्तर भारतात लग्नपत्रिकांवर दोहे छापण्याची प्रथा आहे. त्याऐवजी पत्रिकेवर सरकारी योजना, तसेच सामाजिक सुधारणांचे संदेश दोह्यांच्या स्वरूपात छापण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अमलातही आणला. पत्रिकेच्या डाव्या बाजूला सर्वांत वर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो असलेला महात्मा गांधी यांचा चष्मा छापण्यात आला. त्याच्या खाली दोह्याच्या स्वरूपात स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी बढाओ, जन जन की जिम्मेदारी हैं, घर घर शौचालय हे संदेश छापण्यात आले. बालविवाह हा एक शाप आहे, असेही या पत्रिकेवर छापण्यात आले आहे.