'या' देशात जल्लाद होण्यासाठी आतुर झालेत लोक, दोन पदांसाठी इतक्या लोकांनी केले अर्ज!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 11:48 AM2019-03-05T11:48:24+5:302019-03-05T11:54:29+5:30
वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण बघितले असेल की, तुरूंगात एखाद्या व्यक्तीला फाशी देण्यासाठी एक जल्लाद असतो.
वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण बघितले असेल की, तुरूंगात एखाद्या व्यक्तीला फाशी देण्यासाठी एक जल्लाद असतो. उंच धिप्पाड दिसणार असा हा व्यक्ती असतो. अनेकांना प्रश्नही पडत असेल की, यांची भरती कशी केली जाते? कारण अशाप्रकारची नोकरी करणे कुणालाही आवडणार नाही. तसंच हे काम काही इतर कामांसारखंही किंवा सोपं नसतं.
एका जिवंत व्यक्तीला फासावर लटकवण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये हिंमतीचीही गरज असते. पण श्रीलंकेत यावरून एक उलट चित्र बघायला मिळालं आहे. इथे काही लोक जल्लाद होण्यासाठी आतुर झाले आहेत. इथे जल्लादच्या दोन पदांसाठी नोकरी आहे. यासाठी तब्बल १०० लोकांनी अर्ज केला आहे. ज्यात अमेरिकेतीलही एका नागरिकाचा समावेश आहे.
श्रीलंकन सरकारला मादक पदार्थांच्या तस्करांना फासावर लटकवायचं आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच घोषणा केली होती की, पुढील दोन महिन्याच्या आत मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोषींना फासावर लटकवतील.
श्रीलंकेमध्ये २००४ मध्ये बलात्का, मादक पदार्थांची तस्करी आणि हत्या यांना मोठा गुन्हा मानला जातो. पण यासाठी शिक्षा म्हणून केवळ जन्मठेपच दिली जाते. तसं या देशात फाशी देणे कायद्याने वैध आहे. पण १९७६ पासून आतापर्यंत इथे कुणालाच फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही.
श्रीलंकेच्या न्याय आणि कारागृह सुधार मंत्रालयाने घोषणा केली आहे की, सुरक्षा कारणांमुळे पदासाठी निवडण्यात आलेल्या लोकांची नावे आणि त्यांच्या मुलाखतीच्या तारखेची घोषणा केली जाणार नाही. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी ही होती.
श्रीलंकेच्या न्याय मंत्रालयाने आधीच घोषणा केली होती की, मादक पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ४८ लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील ३० लोकांनी पुढे अपील केलं आहे. त्यामुळे उरलेल्या १८ दोषींना फाशी देण्यात येणार आहे.
श्रीलंकेत आधी एक जल्लाद होता, पण त्याने काही कारणांमुळे २०१४ मध्ये राजीनामा दिली होता. त्यानंतर दुसऱ्या एका जल्लादाला नोकरीवर ठेवण्यात आलं होतं. पण तो सुद्धा हजर झाला नाही. सध्या इथे या पदासाठी जागा रिक्त आहे.