वॉल स्ट्रीटवर राहणार त्या मुलीचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 01:01 AM2017-03-31T01:01:51+5:302017-03-31T01:01:51+5:30
वॉल स्ट्रीटवर त्या निर्भय मुलीचा पुतळा पुढील वर्षी महिला दिनापर्यंत म्हणजेच ८ मार्च २०१८ पर्यंत राहणार आहे
न्यूयॉर्क : वॉल स्ट्रीटवर त्या निर्भय मुलीचा पुतळा पुढील वर्षी महिला दिनापर्यंत म्हणजेच ८ मार्च २०१८ पर्यंत राहणार आहे. सुरुवातीला हा पुतळा ७ मार्च रोजी एका आठवड्यासाठी स्थापन करण्यात आला होता.
महिलांच्या अधिकारांबाबत ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत एक उर्मट प्रतिक म्हणून याकडे बघितले जात आहे. क्रिस्टन विसबल या कलाकाराचे हे प्रदर्शन अगोदर २ एप्रिलपर्यंत वाढविले होते. आता हा पुतळा पुढील वर्षीपर्यंत येथे राहणार आहे. ट्रम्प यांचे एक टीकाकार डी ब्लासिओ यांनी म्हटले आहे की, न्यूयॉर्कच्या नागरिकांसाठी ही मूर्ती अनेक अर्थाने महत्वाची आहे.
विशेषत: येथील मुली आणि महिलांसाठी या पुतळ्याचे महत्व अधिक आहे. हा पुतळा येथे ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या संबंधि एजन्सींने मतदान केल्याचेही त्यांनी सांगितले.