या सावत्र आईनं मुलीच्या वाढदिवशी केलं अत्यंत विचित्र कृत्य, पाहुन तुम्हाला संताप आवरणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 08:23 PM2021-09-06T20:23:47+5:302021-09-06T20:27:45+5:30
एका सावत्र आईनं आपल्या मुलीच्या वाढदिवशीच (Birthday Celebration) अगदी विचित्र कृत्य केलं. तिनं असं काही केलं जे पाहून मुलगी प्रचंड संतापली. हा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही संताप आवरणार नाही.
एका सावत्र आईनं आपल्या मुलीच्या वाढदिवशीच (Birthday Celebration) अगदी विचित्र कृत्य केलं. तिनं असं काही केलं जे पाहून मुलगी प्रचंड संतापली. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. मात्र हा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही संताप आवरणार नाही.
just went to my bday dinner and my bitch ass stepmom blew out my candles like ????? the reaction i had pic.twitter.com/0w7d6C6IuP
— mandy ˚・゚✧*・゚ (@kiIlcops) August 30, 2021
जॉर्जियाच्या (Georgia) अटलांटा येथे राहणारी मँडी बुई (Mandy Bui) ही आपल्या १९ व्या वाढदिवशी कुटुंबीयांसोबत डिनरसाठी बाहेर गेली होती. एकत्र आलेल्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी तिच्यासाठी बर्थडेचं गाणंही गायलं. या दरम्यान ती आपल्या बर्थडे केकवरील फुंकायला जाणार इतक्यात तिच्या सावत्र आईनं एक विचित्र कृत्य केलं.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की आपल्या बर्थडेसाठी अतिशय एक्साइटेड असणारी मँडी आपल्या केकवर लावण्यात आलेल्या मेणबत्ती फुंकणारच होती. मात्र फक्त काही सेकंदांसाठी मँडी जेव्हा आपल्या वडिलांसोबत बोलण्यात बिझी झाली. इतक्यात सावत्र आईनं सर्व मेणबत्ती विझवल्या. मँडीनं तिच्या आईकडं रागानं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच कळत की सावत्र आईच्या या कृत्यामुळे ती प्रचंड चिडली आहे.
मँडी पुढे म्हणाली, मी तिच्यावर खूप नाराज होते कारण माझे तिच्यासोबत चांगले संबंधही नाहीत आणि मला असं वाटलं की तिनं हे सगळं मला राग आणून देण्यासाठीच केलं. आठ सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 2 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.