बाप रे बाप! एका श्वासात या व्यक्तीने असा कारनामा केला की, वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 11:43 AM2020-12-28T11:43:22+5:302020-12-28T11:44:31+5:30
स्टिगने हा कारनामा लहान मुलांना प्रेरित करण्यासाठी केलाय. तो महासागरांची सुरक्षा आणि वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
डेनमार्कच्या एका व्यक्तीने पाण्यात एकाच श्वासात ६६२ फूट ८.७ इचंच पाण्याखाली स्वीमिंग करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला. या व्यक्तीचं नाव स्टीग असून त्याने हे रेकॉर्ड ब्रेकिंग अंतर स्वीमिंग करण्यासाठी केवळ एक श्वास घेतला होता. यासाठी त्याने २ मिनि ४२ सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवला होता.
स्टिगने हा कारनामा लहान मुलांना प्रेरित करण्यासाठी केलाय. तो महासागरांची सुरक्षा आणि वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता त्याचा हा कारनामा रेकॉर्ड बनला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने स्टिगच्या या प्रयत्नाचा तीन मिनिटे लांबीचा एक व्हिडीओ शेअर केलाय.
स्टिगने इतका वेळ श्वास रोखून ठेवण्यासाठी एका टेक्निकचा वापर केलाय. याला त्याने श्वसन विज्ञान म्हटलं आहे. तो घरातील पूलमध्ये श्वास रोखून स्वीमिंगचा अभ्यास करत होता. तो म्हणाला की, 'जगभरातून लोक माझ्या या २०२० डाइव्हचा व्हिडीओचं स्वागत करताना बघून मी आनंदी आहे'.
स्टिग नेहमीच असे वेगवेगळे कारनामे करत असतो. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे बर्फाच्या खाली स्वीमिंग करत आहे. कृपया या ट्रीक तुम्ही घरी ट्राय करू नका. कारण हे करत असताना त्यांच्यासोबत एक्सपर्ट असतात. त्यांनी त्याबाबत अभ्यास केलेला असतो.