अंडे का फंडा! 'हा' डोंगर दर ३० वर्षांनी देतो 'अंडी', वैज्ञानिकही झाले हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 03:09 PM2019-04-30T15:09:59+5:302019-04-30T15:17:30+5:30
तुम्ही पक्ष्यांना आणि प्राण्यांना अंडी देताना पाहिलं असेलच, पण कधी तुम्ही एखाद्या डोंगराला 'अंडी' देताना पाहिलंय का?
विश्व हे वेगवेगळ्या आश्चर्यजनक गोष्टींचा भांडार आहे. आपण सर्वांना हे माहीत आहे की, जगात वेगवेगळ्या विचित्र गोष्टी आहेत. ज्यांच्याबाबत अजूनही आपल्याला माहीत नसतात. म्हणजे आता हीच गोष्ट बघा ना...तुम्ही पक्ष्यांना आणि प्राण्यांना अंडी देताना पाहिलं असेलच, पण कधी तुम्ही एखाद्या डोंगराला 'अंडी' देताना पाहिलंय का?
चीनची जगात वेगवेगळ्या कारणांनी ओळख आहे. येथील अनेक आश्चर्यकारक गोष्टीही प्रसिद्ध आहेत. चीनमध्ये असाच एक वेगळा आणि आश्चर्यकारक डोंगर आहे. चीनच्या दक्षिण-पश्चिम गिझोउ प्रांतात हा डोंगर आहे. या डोंगराची उंची २० मीटर आणि लांबी ६ मीटर आहे. या डोंगराला चीनमध्ये 'चन दन या' नावाने ओळखले जाते. या डोंगराचा रंग काळा असून या डोंगरातून दर ३० वर्षांनी अंड्याच्या आकाराचे दगड बाहेर पडतात.
या डोंगराच्या या खासियतमुळे आजही हा डोंगर जगभराच चर्चेचा विषय आहे. हे चमकदार 'अंड्याला' आधी एक कवच असतं आणि काही दिवसांनी ही अंडी डोंगरातून खाली पडतात. या डोंगराने मोठमोठ्या शास्त्रज्ञांचं डोकं भंडावून ठेवलं आहे.
या डोंगराचं नाव 'चन दन या' असं आहे. याचा हिंदीत अर्थ अंडी देणारा दगड असा होतो. या डोंगरातून निघण्याऱ्या अंड्यांना स्थानिक लोक आनंदाचं प्रतिक मानतात. ही अंडी जेव्हा खाली पडतात तेव्हा गावातील लोक ही अंडी घरी घेऊन जातात.
हा एक काळा डोंगर आहे, या भागात असे अनेक डोंगर आहेत. पण या डोंगरातून अंडी येण्याचा मुद्दा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. सोबतच या डोंगराचं बदलतं रूर वैज्ञानिकांनाही हैराण करत आहे.