राफेल विमानाच्या टेलवर लिहिलेल्या RB आणि BS चा काय आहे अर्थ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:32 PM2020-07-29T16:32:11+5:302020-07-29T17:06:28+5:30
२०१६ मध्ये भारत आणि फ्रान्सच्या दासॉल्ट कंपनीसोबत करार झाल्यावर पहिलं राफेल जेट भारताला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मिळालं होतं. त्या पहिल्या विमानाच्या शेपटीवर एक नंबर होता RB-001
फ्रान्समधून फायटर विमान राफेलची पहिली बॅच भारतातील अंबाला एअरबेसवर पोहचली आहे. ही पहिली बॅच भलेही असेल, २०१६ मध्ये भारत आणि फ्रान्सच्या दासॉल्ट कंपनीसोबत करार झाल्यावर पहिलं राफेल जेट भारताला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मिळालं होतं. त्या पहिल्या विमानाच्या शेपटीवर एक नंबर होता RB-001. या नंबरचा काय अर्थ होतो? नंबर जेटच्या शेपटीवर का दिलेला असतो? याचीच कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे RB आणि BS चा अर्थ?
भारताने फ्रान्ससोबत २०१६ मध्ये ३६ राफेल लढाऊ जेटसाठी 59000 कोटी रूपयांची डील केली होती. या डीलमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती भारतीय वायु सेनेचे प्रमुख आरकेएस भदौरिया. फ्रान्समधील बॉर्डोक्स शहरात गेल्यावर्षी जेव्हा भारताल पहिलं राफेल हॅंडओव्हर करण्यात आलं. तेव्हा भदौरियासोबत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भदौरिया यांनी वायुसेनेचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला होता.
राफेलच्या शेपटीवर म्हणजे शेवटच्या भागात राकेश भदौरिया नावाचा शॉर्ट फॉर्म आहे. जर त्यावर त्यांचं नाव असेल तर त्यांचं वायुसेनेतील महत्वही दिसून येतं. एअर चीन मार्शल पदावर पोहोचणारे भदौरिया १९८० मध्ये वायुसेनेचे फायटर वर्गातील कमिशनर झाले होते. सेनेत आपल्या करिअर दरम्यान भदौरिया यांना ओव्हरऑल ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये अव्वल राहण्यासाठी सॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानितही केले होते.
२६ प्रकारच्या फायटर विमान आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टच्या ४२५० तासांपेक्षा जास्त उड्डाणांचा अनुभव भदौरिया यांच्याकडे आहे. इतकेच नाही तर त्यांनी Cat 'A' क्वालिफाइड फ्लाइंग इंस्ट्रक्टर व पायलट अटॅक प्रशिक्षक होण्याचाही गौरव मिळाला आहे.
राफेल विमानांच्या शेपटीवर RB आणि BS सीरीज असेल...
राकेस भदौरिया यांच्या नावाबाबत जाणून घेतल्यावर हेही जाणून घेणं महत्वाचं आहे की, ३६ राफेल विमानांचे टेल नंबर नंबर RB आणि BS सीरीजचे असतील. राफेल ट्रेनर जो भारताला मिळाला होता, त्याचा टेल नंबरही RB 008 होता. ही संपूर्ण सीरीज भदौरिया यांच्या नावावर समर्पित आहे. तर दुसरी सीरीज म्हणजे BS च्या टेल नंबरवर भदौरिया यांच्याआधी वायुसेनेचे जे प्रमुख होते बीरेंद्र सिंह धनोआ यांच्या इनिशिअलवर आधारित आहे.
या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की, विमानांच्या टेल नंबर ठरवले जाण्याची परंपरा राहिली आहे. कूटनीतिमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वायुसेनेच्या अधिकाऱ्यांची नावे विमानांवर आधीही लिहिली जात होती. LCA तेजस विमानाचं नाव वैज्ञानिक डॉ. कोटा हरिनारायण यांच्या नावावर होतं. त्यांनी स्वदेशी एअरक्राफ्टच्या प्रमुख डिझायनर आणि प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून सेवा दिली होती. त्याचप्रमाणे MiG 27 विमानांच्या टेल नंबर TS आणि सुखोईचा टेब नंबर SB हे वायुसेनेच्या माजी अधिकाऱ्यांच्या नावांचे शॉर्ट फॉर्म आहेत. एका रिपोर्टनुसार SB चा अर्थ दोन युवा विंग कमांडरांच्या नावांचा शॉर्ट फॉर्म होता.
VIDEO: शत्रूंना धडकी भरवणारी राफेल विमानं भारतात दाखल; अंबाला हवाईतळावर लँडिंग