बाबो! 'या' मिशीवाल्या राजकुमारीच्या नादाला लागून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या, वाचा भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 04:51 PM2020-07-20T16:51:16+5:302020-07-20T16:58:19+5:30
त्यावेळच्या ईराणच्या राजकुमारीचे सौंदर्याचे किस्से आजही चर्चेचा विषय ठरतात.
सध्याच्या काळात कोणत्याही व्यक्तीची सुंदरता त्या व्यक्तीची शरीरयष्टी, चेहरा आणि राहणीमानाच्या सवयीवर अवलंबून असते. असं म्हणलं जातं की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं. सुंदरतेच्या किंवा सौंदर्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात. अशाच एका अनोख्या राजकुमारीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १९ व्या शतकात लठ्ठपणालाच सुंदरता मानलं जात होतं. त्यावेळच्या ईराणच्या राजकुमारीचे सौंदर्याचे किस्से आजही चर्चेचा विषय ठरतात.
ईराणची राजकुमारी ताज अल कजर सुल्ताना हीने सुंदरतेच्या सगळयाच संकल्पनांना चुकीचे ठरवले आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या राजकुमारीच्या तोंडावर लांबच लांब मिश्या होत्या तसंच ती खूप लठ्ठ सुद्धा होती. विशेष म्हणजे तरी सुद्धा लोक या राजकुमारीला खूप पसंत करत होते.
माध्यामांच्या अहवालानुसार त्याकाळी जास्तीत जास्त तरूण या राजकुमारीच्या सुंदरतेमागे वेडे होते. प्रत्येक तरूणाची या राजकुमारीशी लग्न करण्याची इच्छा असायची. पण राजकुमारीने अनेक तरूणांच्या प्रस्तावाला नकार दिला होता. असं मानंल जातं की या राजकुमारीच्या नकाराने १३ तरूणांनी आत्महत्या केली होती.
तरूणांना नकार देण्याचं कारण म्हणजे राजकुमारीचे लग्न आधीच एका श्रीमंत घरातील अमीर हुसैन खान शोजा ए सल्तनेह यांच्याशी झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं आणि दोन मुली झाल्या. कालांतराने या दोघांचा घटस्फोट होऊन हे दोघं वेगळे झाले. असा दावा केला जातो की या राजकुमारीचे खूप अनैतिक संबंध होते. त्यातील दोन लोकांसोबत या राजकुमारीचे अफेअर होते.
गुलाम अली खान अजीजी अल सुल्तान आणि ईरानी कवि आरिफ काजविनी. असं म्हणतात की राजकुमारी त्या काळातील अधुनिक महिलांपैकीच एक होती. वेस्टर्न संस्कृतीने प्ररित असल्यामुळे या राजकुमारीचे राहणीमानही तसेच होते. मुस्लिम संसकृतीप्रमाणे हिजाब न घालणारी आणि पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे जीवन जगणारी ही त्या काळातील पहिली महिला होती.
फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी
धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण