लोकांचे टोमणे ऐकत घरदार सांभाळून 'ती' बनली मुंबईतील यशस्वी टॅक्सीचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 12:28 PM2020-02-02T12:28:27+5:302020-02-02T13:04:40+5:30

जगात असे अनेक लोक असतात. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल जाणून घेतल्यानंतर खूप आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळत असते.

Story of a woman taxi driver in mumbai will inspire you | लोकांचे टोमणे ऐकत घरदार सांभाळून 'ती' बनली मुंबईतील यशस्वी टॅक्सीचालक

लोकांचे टोमणे ऐकत घरदार सांभाळून 'ती' बनली मुंबईतील यशस्वी टॅक्सीचालक

googlenewsNext

(image credit-humans of bombay)

जगात असे अनेक लोक असतात.त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल जाणून घेतल्यानंतर खूप आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळत असते. मुंबई किंवा उपनगरात अनेक ठिकाणी वाहन चालवून पुरूष आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. टॅक्सी किंवा रिक्षा चालवणं हे मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळवून देणारे काम आहे. फक्त पुरूषच नाही तर महिला सुद्धा हे काम स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी करत असतात. आज आम्ही मुंबईतल्या टॅक्सी चालक महिलेच्या प्रवासाबद्दल सांगणार आहोत.

या महिलेच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने त्यांचे घर सांभाळले. आईचे कष्ट पाहत ही कष्टाळू महिला लहानाची मोठी झाली.  त्यामुळे स्वतःसुद्धा आईप्रमाणे कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे स्वप्न तिने पाहिले. लग्नाच्या आधी पासून ती काम करत होती. लग्नानंतर सुद्धा परिस्थितीचा सामना करत तीने आपले काम न थांबवता सुरूच ठेवले.  घरच्या कामाची आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत ती पूर्ण वेळ काम करते. 

या महिलेले एकदा वर्तमानपत्रात वाचले की महिलांना सुद्धा टॅक्सी चालवण्यासाठी परमीट मिळतं. त्यानंतर या महिलेने ड्रायविंग टेस्ट पास करत टॅक्सी घेतली. यात या महिलेच्या पतीने तीला खूप साथ दिली. बघता बघता काही महिन्यातच शहरातील असंख्य टॅक्सीजमध्ये या महिलेच्या टॅक्सीचा सुद्धा समावेश झाला. 

सुरूवातीच्या काळात या महिलेच्या वाहन चालवण्यावरून अनेक वादंग निर्माण झाले. पण या महिलेची टॅक्सी चालवण्याची कला पाहून लोकांची शंका दूर झाली. अनेकदा समस्यांचा सामना सुद्धा करावा लागला.  प्रवासी मिळणं सुद्धा मुश्कील व्हायचं. अनेकदा पुरूष  चालकांनी टॅक्सी चालवण्यापासून या महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला. ड्रायविंग स्किलवर सवाल उपस्थित करण्यात आले.  अशावेळी निराश न होता संयमी भूमिका ठेवत आत्मविश्वासाने काम करण्याचं  तीनं ठरवलं. 

(Image credit- humans of bombay)

त्यानंतर प्रवाश्यांची ने आण करत असताना  या महिलेला प्रवाश्यांकडून चांगला  प्रतिसाद मिळाला. इतकंच नाही तर चांगले अनुभव सुद्धा आले. या महिलेला टॅक्सी चालवण्याचे काम करण्याला ३ वर्ष झाले आहेत. वरळी ते लोअर परेल स्थानक या अंतरावर या महिलेची शेअरींग टॅक्सी चालत असते. अनेकांना जगण्याची उम्मेद आणि प्रेरणा देणारा या महिलेचा अनुभव आहे. 

Web Title: Story of a woman taxi driver in mumbai will inspire you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.