विचित्र पण सत्य आहे! भावाच्या मुलाला बहीणीने जन्म दिला; कारण ऐकून जग हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 09:28 IST2023-11-09T09:27:55+5:302023-11-09T09:28:35+5:30
ऐकायला जरा विचित्र प्रकार असला तरी हे मुल तिचा खास भाचा असणार असल्याचे ही महिला म्हणत आहे.

विचित्र पण सत्य आहे! भावाच्या मुलाला बहीणीने जन्म दिला; कारण ऐकून जग हैराण
महिलेने स्वत:च्याच भावाच्या मुलाला जन्म दिला आहे. समलिंगी संबंधांमुळे भावाने एका पुरुषासोबतच लग्न केले आहे. यामुळे त्याचे कुटुंब वाढविण्यासाठी बहीणच आपल्या भावाच्या मुलासाठी सरोगेट मदर बनली आहे. ऐकायला जरा विचित्र प्रकार असला तरी हे मुल तिचा खास भाचा असणार असल्याचे ही महिला म्हणत आहे.
अमेरिकेतील हा प्रकार आहे. ३० वर्षांच्या सबरीना हँडरसनने तिच्या ३३ वर्षांचा भाऊ शेन पॅटरी याची मदत केली आहे. शेन हा गे आहे. त्याने पॉ़ल नावाच्या ३७ वर्षीय पुरुषाषशी लग्न केले आहे. या दोघांनी २०२० मध्ये पालक बनण्याचा निर्मय घेतला होता. परंतू, दोघेही पुरूष असल्याने मुल जन्माला घालू शकत नव्हते.
सबरीनाला आधीच चार मुले आहेत. मिरर युकेनुसार सबरीना तिचे बीजांड आणि पॉलचे स्पर्म वापरून प्रेग्नंट राहिली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मुलाला जन्म दिला. यंदा त्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.
सबरीना सांगते की, तिचे एग्ज वापरले गेले, यामुळे ते मूल तिचे आहे. ती त्या मुलाची आई आहे, असे लोक सांगतात. परंतू, ते मूल त्यांचे आहे. ते कधीच माझे मूल नव्हते. प्रत्येकाची जगात येण्याची काहीतरी गोष्ट असते. त्याची सर्वात खास आहे. त्याला मी माझा सर्वात आवडता भाचा म्हणून पाहते.
सबरीनाला आणखी चार बहीणी आहेत. परंतू, मोठ्या बहिणीचे तीन सी-सेक्शन झाले आहेत. तर लहान बहीणीला तिच्या गरोदरपणात अडचणी आल्या होत्या. उर्वरित दोन बहिणी अजूनही किशोरवयीन आहेत. यामुळे शेनला सबरीनाच त्याच्या मुलाला जन्म देऊ शकते असे वाटले, त्याने ही कल्पना तिला सांगितली, तेव्हा ती देखील लगेचच तयार झाली होती.
नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2021 पर्यंत गर्भधारणेच्या पाच अयशस्वी प्रयत्नांनंतर, एक गर्भपात देखील झाला. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये ती पुन्हा गरोदर राहिली.