आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कपल दोन महिन्यांचं बाळ सोबत घेऊन आले अन् पाहुणे हैराण झाले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:06 AM2021-03-27T10:06:37+5:302021-03-27T10:10:08+5:30
ही घटना पाकिस्तानातील हफीजाबादमधील आहे. जे लोक या रिसेप्शनमद्ये सहभागी झाले होते ते सगळेच हैराण झाले. हे रिसेप्शन २३ मार्चला पार पडलं.
लग्न किंवा रिसेप्शनमधील अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना पाकिस्तानातून समोर आली आहे. इथे एक कपल त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये त्यांचं दोन महिन्यांचं बाळ घेऊन पोहोचल आणि एकच चर्चा रंगली. दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना पाकिस्तानातील हफीजाबादमधील आहे. जे लोक या रिसेप्शनमद्ये सहभागी झाले होते ते सगळेच हैराण झाले. हे रिसेप्शन २३ मार्चला पार पडलं.
आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कपल दोन महिन्यांचं बाळ घेऊन पोहोचलं. त्यानंतर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या लग्नाबाबत लोक अंदाज लावत आहेत की, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हे बाळ त्यांच्यासोबत कसं? काही लोक म्हणाले की, हे प्रकरण समजण्यापलिकडचं आहे तर काही म्हणाले हे विचित्र प्रकरण आहे. (हे पण वाचा : कमालच झाली! स्वीमिंगसाठी गेलेली महिला अचानक झाली गायब, २० दिवसांनी नग्नावस्थेत ड्रेनेजमधून तिला काढलं!)
काय आहे नेमकं प्रकरण?
बीबीसीने याबाबत कपलसोबत संवाद साधला आणि हे प्रकरण विस्तृतपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या कपलने सांगितले की, 'आमचं लग्नाचं रिसेप्शन गेल्यावर्षी १४ मार्च २०२० ला होणार होतं. पण १४ मार्चला लॉकडाउन लागू झाला त्यामुळे रिसेप्शन टाळावं लागलं. (हे पण वाचा : स्लिम कंबर दाखवण्यासाठी अशी दिली पोज, अभिनेत्रीला मागावी लागली माफी!)
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागल्यानंतर परदेशातून आपला देश पाकिस्तानमध्ये परत येणं शक्य नव्हतं. ज्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागलं. लॉकडाऊन वाढतच गेला आणि रिसेप्शनही कॅन्सल करावं लागलं.
अशात प्रेग्नेंट झाली पत्नी
परिवारातील लोका रिसेप्शनच्या तारखेबाबत कन्फ्यूज होते. त्यानंतर रमजान आणि नंतर ईद, लॉकडाऊन सुरूच राहिलं. रेयान म्हणाला की, सरकारने सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यास सुरूवात केली आणि त्यावेळी माझी पत्नी प्रेग्नेंट होती. ज्यामुळे रिसेप्शन करणं शक्य नव्हतं. या वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात पत्नीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर आम्ही रिसेप्शनचा प्लॅन केला. यासाठी आमचे परिवारही तयार झाले.