...म्हणून एका अनोळखी कपलने हॉटेलमधील वेट्रेसला गिफ्ट केली कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 11:39 AM2019-11-30T11:39:44+5:302019-11-30T11:41:58+5:30
अनेकदा काही वाईट घटना घडल्यावर अनेकजण म्हणतात की, या जगात माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. पण अशाही काही घटना समोर येतात की, ज्यामुळे जगात आजही माणुसकी शिल्लक आहे यावर ठाम विश्वास बसतो.
अनेकदा काही वाईट घटना घडल्यावर अनेकजण म्हणतात की, या जगात माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. पण अशाही काही घटना समोर येतात की, ज्यामुळे जगात आजही माणुसकी शिल्लक आहे यावर ठाम विश्वास बसतो. आता हीच घटना बघा ना. एड्रियाना एडवर्ड्स नावाची तरूणी एका हॉटेल काम करण्यासाठी चार तास पायी चालत जात होती. ही बाब त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या एका कपलच्या कानावर पडली आणि त्या कपलने एड्रियानाला चक्क एक कार गिफ्ट केली.
एड्रियाना ही अमेरिकेतील रेस्टॉरन्ट चेन 'डेनी'मध्ये वेट्रेसचं काम करते. रोज ती घरापासून २२ किलोमीटर चालत हॉटेलला जात होती. यासाठी तिला तब्बल ४ तास इतका वेळ लागायचा. पण बघा तिची अडचण समजून घेऊन एका दिलदार कपलने तिला गाडी गिफ्ट केली आणि तिची समस्या दूर केली.
एड्रियाना नेहमीप्रमाणे टेक्सासच्या गलवेस्टनमधील हॉटेलमध्ये काम करत होती. मंगळवारी जेव्हा कपल नाश्त्यासाठी या हॉटेलमध्ये आलं तेव्हा एड्रियानाने गप्पा करता करता त्यांना सांगितलं की, ती कारसाठी पैसे गोळा करतीय. नंतर ते कपल त्यांचं बिल देऊन निघून गेले. ते पुन्हा परत आले त्यांनी एड्रियानाकडे २०११ निसान सेन्ट्रा कारची चावी दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा एड्रियानाला हे कळालं की, ही कार तिच्यासाठी घेण्यात आली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. एड्रियानाने सांगितले की, आधी तिला हॉटेलला पोहोचायला ४ तास लागायचे, आता ती ३० मिनिटात हॉटेलला पोहोचते. त्या कपलने एड्रियानाला एका अटीवर ही कार गिफ्ट केली. ती अट म्हणजे मदत करण्याची ही प्रथा पुढे नेण्याची.
एड्रियाना म्हणाली की, 'मला अजूनही ही घटना एखाद्या स्वप्नासारखी वाटते. मी दर दोन तासांनी कार बाहेर उभी आहे की नाही हे खिडकीतून बघत असते'. यआधीही अलबामा शहरातील एका बॉसने त्याच्या कर्मचाऱ्याला कार गिफ्ट केली होती. कारण ही व्यक्ती रोज ३२ किलोमीटर चालत ऑफिसला येत होती.