कोणतही ट्रेनिंग न घेता हिमालय सर करणारी पहिली कुत्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:19 PM2019-03-08T13:19:33+5:302019-03-08T13:27:21+5:30

हिमालयाचं नाव ऐकताच चांगल्या चांगल्यांची पोटात आधी गोळा येतो. पण एका मादा कुत्रीने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय हिमालय सर केला आहे.

This stray dog first to climb himalayan summit without any training | कोणतही ट्रेनिंग न घेता हिमालय सर करणारी पहिली कुत्री!

कोणतही ट्रेनिंग न घेता हिमालय सर करणारी पहिली कुत्री!

(Image Credit : www.telegraph.co.uk)

हिमालयाचं नाव ऐकताच चांगल्या चांगल्यांची पोटात आधी गोळा येतो. पण एका मादा कुत्रीने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय हिमालय सर केला आहे. इतकेच नाही तर पहिल्यांदाच एका कुत्र्याने इतक्या उंचीवर जाण्याचा पराक्रम केला आहे. अनेकांना असं वाटत असेल की, या कुत्रीला आधी प्रशिक्षण देण्यात आलं असेल. पण तसं काही नाही. ही रस्त्यावर राहणारी एक मोकाट कुत्री आहे.

या कुत्रीचं नाव आहे Mera. टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, मेराने २३, २८९ फूट उंच चढाई केली. इतकेच नाही तर मेराने कोणत्याही सपोर्टशिवाय हे काम केलंय. हिमालयन डाटाबेस या संस्थेने सांगितले की, याआधीही काही कुत्रे एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत येऊन पोहोचले आहेत. पण मेराने जितकी उंची सर केली तितकी कुणी करू शकलं नाही.

मेरा ज्या टीमसोबत होती त्यांची ट्रेक्रिंग १० दिवसांची होती. Don Wagowsky व्यवसायाने एक माउंटेन गाइड आहे. त्याने सांगितले की, पहिल्यांदा त्याला असं वाटलं होतं की, इतक्या थंडीत ती मरेल, पण तसं झालं नाही.

मेरा क्रू मेंबर्ससोबत टेंट शेअर करत होती. तिला खायलाही तिथेच मिळत होतं. लोक जे खायचे तेच मेराला दिलं जायचं. Don सांगतात की, त्यांना वाटतं ही एक स्पेशल डॉग आहे. 

Web Title: This stray dog first to climb himalayan summit without any training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.