स्वच्छतेसाठी घराघरात वापरल्या जाणाऱ्या डेटॉलचा इतिहास माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:38 AM2020-04-21T10:38:24+5:302020-04-21T10:53:27+5:30
जगभरात HIV/AIDS बाबत जागरूकता केली जात होती. त्यामुळे रेजर डेटॉलने धुण्याची प्रथा घरी आणि सलून मध्येही होत होती. डेटॉल घराघरात ओळखू जाऊ लागलं होतं.
डेटॉल हे नाव कुणाला माहीत नाही असं क्वचितच कुणी सापडेल. सध्या कोरोनामुळे वेगवेगळ्या प्रॉडक्टसोबत डेटॉलही गायब झाल्याचं बघायला मिळत आहे. जेव्हा कोरोना व्हायरसचं थैमान सुरू झालं होतं तेव्हा डेटॉलचे सर्व प्रॉडक्ट संपले होते.
कारण डेटॉल हे लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. पण याच नेहमीच वापरातील डेटॉलचा इतिहास तुम्हाला माहीत नसेल. आज आम्ही तुम्हाला याचा इतिहास सांगणार आहोत. साधारण 80 आणि 90 च्या दशकात डेटॉल अॅंटीसेप्टीक म्हणून पुरूषांच्या शेव्हिंग किटमध्ये ठेवलं जायचं. अजूनही ठेवलं जातं. तुरटीसोबत अनेक लोक याचा वापर करत होते.
याच काळात जगभरात HIV/AIDS बाबत जागरूकता केली जात होती. त्यामुळे रेजर डेटॉलने धुण्याची प्रथा घरी आणि सलून मध्येही होत होती. डेटॉल घराघरात ओळखू जाऊ लागलं होतं.
मात्र, नंतर बाजारात अनेक आफ्टरशेव लोशन आले आणि डेटॉल थोडं मागे पडलं. पण बाजारातून गायब झालं नाही. आजही अॅंटीसेप्टीक म्हणून भारतात याचाच वापर अधिक केला जातो. हेच कारण आहे कोरोनाच्या थैमानात सॅनिटायजरची मागणी वाढली तेव्हा डेटॉलचे प्रॉडक्ट ऑनलाइन आणि स्टोरमधून गायब झाले.
कधीपासून होतोय वापर?
Dettol च्या वेबसाईटवर त्यांच्या इतिहासाबाबत सांगितले आहे. त्यानुसार डेटॉलचा वापर भारतात गेल्या 80 वर्षांपासून केला जात आहे. भारतात याच्या वापराची सुरूवात 1933 मध्ये झाली होती. तेव्हापासून नंतर डेटॉल घराघरात दिसू लागलं.
206 वर्षांआधी झाली होती सुरूवात
डेटॉल हा एक ब्रिटीश ब्रॅन्ड आहे जो Reckitt Benckiser या कंपनीचा आहे. या कंपनीची सुरूवात साधारण 200 वर्षांआधी 1814 मध्ये झाली होती. अनेक अडचणींनंतर कंपनीने त्यांचे प्रॉडक्ट जगभरातील 200 देशांमध्ये विकणे सुरू केले होते. कंपनीकडून खासकरून Cleaning products, health care products आणि Nutrition प्रॉडक्ट तयार केले जातात.
डेटॉल अॅंटीसेप्टिकमध्ये chloroxylenol असतं जे सर्जिकल इन्फेक्शन आणि स्किन इन्फेक्शन रोखण्यासाठी फायदेशीर असतं. त्यासोबतच Dettol Antibacterial Surface Cleanse मधे benzalkonium chloride असतं. जे मुख्यपणे घराची स्वच्छता करण्यासाठी वापरलं जातं.
कोरोनानंतर पसरली होती अफवा
कोरोना महामारी पसरल्यावर डेटॉलबाबत एक अफवाही सोशल मीडियात पसरली होती. काही खोट्या मेसेजेसमध्ये असा दावा करण्यात आला होता की, डेटॉल अॅंटीसेप्टीक कोरोनाला रोखण्यासाठी मदत करतं. मात्र, त्यानंतर अनेक फॅक्टचेक स्टोरीतून हे नाकारण्यात आलं होतं.