डोक्याबाहेर मेंदू असलेल्या चिमुकलीच्या जगण्याचा संघर्ष वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 04:01 PM2017-10-09T16:01:10+5:302017-10-09T18:50:30+5:30

आठ महिन्यांपूर्वी ग्रिव्हिंग अॅनलेला एक गोड मुलगी झाली. पण तिचा मेंदू तिच्या डोक्याच्या कवटीच्या बाहेर असल्याने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते.

Via the struggle for the survival of the brain, which is beyond the head | डोक्याबाहेर मेंदू असलेल्या चिमुकलीच्या जगण्याचा संघर्ष वाया

डोक्याबाहेर मेंदू असलेल्या चिमुकलीच्या जगण्याचा संघर्ष वाया

Next
ठळक मुद्देजन्मानंतर काही अवधीतच मातेला कळतं की तिच्या बाळाच्या शरीरात व्यंग असल्याने त्या बाळाची जगण्याची शक्यता फार कमी आहे.बाळामध्ये व्यंग असलं तरी कोणत्याही आईचं बाळावरचं प्रेम कमी होत नाही. याही आईने आपल्या बाळाच्या उपचारासाठी बरीच पराकाष्ठा केली.मी तिला कुशीत घेऊन झोपवत होते आणि तिने शेवटचा श्वास घेतला. आम्ही बोललोही नव्हतो आणि या जगातून ती कायमची निघून गेली.

एका जिवाला आपल्या गर्भात नऊ महिने वाढवल्यानंतर बाळाचा जन्म होतो. पण जन्मानंतर काही अवधीतच मातेला कळतं की तिच्या बाळाच्या शरीरात व्यंग असल्याने त्या बाळाची जगण्याची शक्यता फार कमी आहे. हे असं काही ऐकून तर कोणत्याही आईच्या पायाखालची जमीनच सरकेल. असाच एक वाईट अनुभव अमेरिकेतील ऑक्सफर्ड शहरातील एका आईला आला.

आठ महिन्यांपूर्वी ग्रिव्हिंग अॅनलेला एक गोड मुलगी झाली. पण तिचा मेंदू तिच्या डोक्याच्या कवटीच्या बाहेर असल्याने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते. बाळामध्ये व्यंग असलं तरी कोणत्याही आईचं बाळावरचं प्रेम कमी होत नाही. याही आईने आपल्या बाळाच्या उपचारासाठी बरीच पराकाष्ठा केली. डॉक्टरांनी सांगितलेल्या अनेक चाचण्या, शस्त्रक्रिया त्यांनी करून घेतल्या. पण जग पाहायच्या आतच मे रोझ गिब्ने या नवजात बालिकेचा मृत्यू झाला.

यावर त्या दुर्दैवी बाळाची आई म्हणाली की ,‘ तिने जन्माला आल्यापासून डोळेही उघडले नव्हते. पण तरीही ती माझ्या डोळ्यातून सारं जग पाहत होती. दोन आठवड्यांपूर्वी तिने डोळे उघडले. मी तिला कुशीत घेऊन झोपवत होते आणि तिने शेवटचा श्वास घेतला. आम्ही बोललोही नव्हतो आणि या जगातून ती कायमची निघून गेली. तिने जेव्हा माझ्यासमोर पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा मला वाटलं आता ती कायमची बरी झाली आहे. तिच्या नजरेतूनही तेच जाणवत होतं. त्यामुळे आम्ही सारेच खूश होतो. पण क्षणार्धात तिने सुस्कारा सोडला आणि माझ्या मांडीवरच तिने जीव सोडला.’

ऑक्सफर्डमधल्या जॉन रॅक्टिफल हॉस्पिटलमधले डॉक्टर याबाबत बोलताना म्हणाले की, ‘ तिला एन्सेफेलोसेल हा आजार होता. मज्जासंस्थेच्या नलिका आणि पाठीचा कणा तयार होणारी संरचना गर्भधारणेदरम्यान पूर्ण होत नाही तेव्हा बाळाला एन्सेफेलोसेल होतो. या आजारात बाळाचा मेंदू डोक्याच्या बाहेर येतो. डोक्याच्या मागच्या बाजूला एक गोलसर कवटी निर्माण होऊन आतमध्ये मेंदू तयार होतो.’ या व्यतिरिक्त मे रोझ गिब्नेला श्वसनाचाही त्रास होता, असंही डॉक्टर म्हणाले.

डॉक्टरांनी मे रोझला १ ऑक्टोबरला घरी सोडलं. तिच्या आजीने मे रोझचे कपडे बदलून तिला आई-बाबांकडे सुपूर्द केलं. ती चिमुकली आपल्या आईच्या मांडीवर शांत पडून होती. पण तिनं आपल्या आईकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत गेलं. तिचा चेहरा जांभळा पडू लागला आणि दुसऱ्या मिनिटाला तिचा श्वास थांबला. त्या चिमुकलीच्या आईबाबांनी अॅम्ब्युलन्स येईपर्यंत आणि इतर उपचार मिळेपर्यंत तिच्या छातीवर हलक्या हाताने दाबणं सुरू केलं. पण तिने केव्हाच प्राण सोडला होता. तिची आई अॅनले म्हणते की ‘ तिच्या येण्याने मी पूर्ण झाले होते. तिच्यामुळे मला मातृत्वाचं सुख मिळालं होतं. पण तिच्या जाण्याने केव्हाच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.’

फोटो सौजन्य - mirror.co.uk

Web Title: Via the struggle for the survival of the brain, which is beyond the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य