अभिमानास्पद! शाळेची वीज कापली म्हणून सातवीच्या मुलांनी 'अशी' लढवली शक्कल....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:01 PM2020-03-02T17:01:25+5:302020-03-02T17:17:57+5:30
बीडमधिल सातवीतील विद्यार्थ्यांनी एक पराक्रम केला आहे.
तुमच्या सगळ्यांच्या घरी २४ तास वीजपुरवठा असेल पण भारतातील असे अनेक ठिकाणं आहेत. ज्याठिकाणी लाईट घरात खूपचं कमी वेळ येते. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये वीज पुरवठा दिवसभर खंडीत झालेला असतो. फक्त काहीवेळासाठी लाईट येत असते. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्रातील बीडमधिल सातवीतील विद्यार्थ्यांनी एक पराक्रम केला आहे.
इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या या मुलांनी पवनचक्की तयार केली आहे. जेणेकरून शाळेतील वर्गात अंधार होणार नाही. कुर्ला या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे २५ हजार रूपये वीज बील थकीत होते. ज्यामुळे महावितरण विभागाने या जिल्हा परिषदेच्या शाळेचा वीज पुरवठा खंडीत केला होता. प्रशासनाच्या चुकीमुळे मुलांना अंधारात बसून अभ्यास करावा लागत होता. या परिस्थितीवर मात करत या शाळेतील सातवीत शिकत असलेल्या मुलांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने ५ दिवसात पवनचक्की तयार केली. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण शाळेतील अंधार नाहीसा करण्यासाठी मदत झाली. (हे पण वाचा-बाबो! 'या' भिकाऱ्यांना मिळतो वीक-ऑफ; दिवसानुसार बदलतात देवाचा फोटो, जाणून घ्या सत्य)
मुलांच्या भावना समजून घेत या उपक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी मदत केली. ही पवन चक्की तयार करण्यासाठी जवळपास ५ हजार रुपयांचा खर्च आला. या मिनी पवनचक्कीमध्ये सोलार युनिट लागले आहे. आणि ५०० वॅटची वीज सुद्धा आहे. ( हे पण वाचा-'या' आजीबाईचं इंग्रजी ऐकून शशी थरूरही म्हणतील... ठोको ताली)