ना प्रेग्नेन्सीची लक्षणं ना बेबी बंप, पोट दुखलं म्हणून हॉस्पिटल गेली अन् बाळ घेऊन आली विद्यार्थीनी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 05:48 PM2022-03-14T17:48:06+5:302022-03-14T17:51:46+5:30
एक दिवस अचानक पोटात दुखू लागल्याने एली हॉस्पिटलमध्ये गेली आणि तेव्हा तिला डॉक्टरांनी जे सांगितलं जे ऐकून तिला धक्का (Pregnancy Complications) बसला.
(Image Credit : mirror.co.uk)
प्रेग्नेन्सी आणि आई होण्याची वाट प्रत्येक महिला बघत असते. हे सगळं प्लानिंग करून केलं आणि त्यानुसार सगळं झालं तर ठीक नाही तर याचं सरप्राइज मिळालं तर समस्या निर्माण होऊ शकते. असंच काहीसं झालं एली जॉनसन (Ellie Johnson) नावाच्या विद्यार्थिनीसोबत. तिला प्रेग्नेन्सीच्या ९ महिन्यांपर्यंत हे माहीत नव्हतं की, तिच्या पोटात बाळ वाढत आहे.
एक दिवस अचानक पोटात दुखू लागल्याने एली हॉस्पिटलमध्ये गेली आणि तेव्हा तिला डॉक्टरांनी जे सांगितलं जे ऐकून तिला धक्का (Pregnancy Complications) बसला. एली अजिबात कल्पना नव्हती की, ती प्रेग्नेंट आहे. पण तेव्हा हॉस्पिटलमधून घरी परतली तेव्हा ती एका गोंडस मुलीला सोबत घेऊन गेली.
ब्रिटनच्या एसेक्समध्ये राहणारी एली जॉनसननुसार, तिच्या ३ प्रेग्नेन्सी टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. तसेच ती प्रेग्नेन्सी टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचंही सेवन करत होती. तिच्या पोटात बाळ आहे हे माहीतच नसल्याने तिने ९ महिन्याच्या प्रेग्नेन्सी दरम्यानही गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या होत्या. यादरम्यान तिला वेगळं असं काहीच जाणवलं नाही आणि ना तिला प्रेग्नेन्सीची काही लक्षणं दिसली. इतकंच तर तिला बेबी बंपही दिसत नव्हतं.
Mirror च्या रिपोर्टनुसार, एलीला पहिल्यांदा ऑगस्ट २०१८ मध्ये विचित्र वाटल होतं. तिला वाटलं की, तिच्या शरीरात जणू सगळं थांबलंय. त्यानंतर २० डिसेंबरला तिने अल्ट्रासाउंड टेस्ट केली. पण त्यात काहीच आढळलं नाही. मग दिवस ती तिच्या आजीच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर झोपायला गेली तेव्हा तिच्या पोटात आणि पाठीत दुखू लागलं होतं. रात्री उशीरा २ वाजता तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तिला टॉयलेटमध्ये विचित्र जाणवलं आणि नर्सने तिला पाहिलं तर ती लेबर पेनमध्ये होती. काही वेळातच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यावेळी तिला फार आनंद झाला नाही. पण नंतर मग ती बाळाचं तोंड बघून तिच्या प्रेमात पडली.