केसांचा मिलिट्री कट केला म्हणून विद्यार्थ्याला शाळेने दिली भयंकर शिक्षा, वाचून होईल संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 08:45 PM2022-04-29T20:45:18+5:302022-04-29T20:48:20+5:30
आधुनिकतेचे धडे फार पुर्वीपासून गिरवणाऱ्या इंग्लंडमध्येच एका शाळेने विद्यार्थ्याने विशिष्ट पद्धतीने केस कापले म्हणून त्याला भयानक शिक्षा दिली आहे. ही शिक्षा काय आहे हे समजल्यावर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.
शाळेत मुलांनी चूकी करताच शिक्षक त्यांना शिक्षा करतात. आत्ताच्या युगात विद्यार्थ्यांना छडीने मारण्याची वैगरे शिक्षा केली जात नाही. याबाबत पालकही विशेष सतर्क झाले आहेत. पण आधुनिकतेचे धडे फार पुर्वीपासून गिरवणाऱ्या इंग्लंडमध्येच एका शाळेने विद्यार्थ्याने विशिष्ट पद्धतीने केस कापले म्हणून त्याला भयानक शिक्षा दिली आहे. ही शिक्षा काय आहे हे समजल्यावर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.
इंग्लंडमधील किंग्सवुड शाळेतील ही घटना आहे अन् शिक्षा झालेल्या मुलाचे नाव चार्ली असे आहे. चार्लीने इस्टर डेच्या दिवशी हेअरकट केला. भारतात या कटला मिलिट्री कट असे म्हणतात. चार्ली शाळेत गेल्यावर शाळा प्रशासनाने त्याला भयंकर शिक्षा दिली. त्याला अंधऱ्या खोलीत बंद करण्यात आले. या दरम्यान त्याला फक्त दोनच वेळा टॉयलेटचा वापर करायची मुभा देण्यात आली. शाळेने त्याच्या आईला याची कल्पना देताच ती संतापली.
शाळा प्रशासनाला तिने फैलावर घेतले. यावर शाळेने तिला असे कारण दिले की तुमच्या मुलाची फॅशन अत्यंत वाईट आहे. या फॅशनमुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होतं. तसेच या हेअरकटमुळे तुमच्या मुलाचे केस दोन वेगळ्या रंगाचे दिसतात. त्याच्या आईने स्पष्टीकरण दिले ती त्याच्या केसाला कोणताही रंग देण्यात आलेला नाही. मात्र, शाळा प्रशासनाने तिचे काहीह ऐकुन न घेता तिच्या मुलाला जोपर्यंत त्याचे केस वाढत नाहीत तोपर्यंत शाळेत न पाठवण्यास सांगितले.