विद्यार्थिनीने असाइन्मेंटच्या नावाखाली दिला 'कोरा पेपर'; तरीही मिळाले पूर्ण मार्क्स, कसे भौ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 02:49 PM2019-10-11T14:49:21+5:302019-10-11T14:53:10+5:30

शाळा किंवा कॉलेजमध्ये तुम्ही अनेकदा असाइन्मेंट तयार केल्या असतील. त्यात तुम्हाला चांगले मार्क्सही मिळाले असतील. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी मोठी मेहनतही करावी लागली असेल.

Student received full marks for handing in a blank report as assignment | विद्यार्थिनीने असाइन्मेंटच्या नावाखाली दिला 'कोरा पेपर'; तरीही मिळाले पूर्ण मार्क्स, कसे भौ?

विद्यार्थिनीने असाइन्मेंटच्या नावाखाली दिला 'कोरा पेपर'; तरीही मिळाले पूर्ण मार्क्स, कसे भौ?

googlenewsNext

शाळा किंवा कॉलेजमध्ये तुम्ही अनेकदा असाइन्मेंट तयार केल्या असतील. त्यात तुम्हाला चांगले मार्क्सही मिळाले असतील. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी मोठी मेहनतही करावी लागली असेल. जपानमधील एका विद्यार्थ्यालाही अशीच एक असाइन्मेंट देण्यात आली होती. पण त्याने शिक्षिकेला कोरा कागद परत दिला. मात्र, तरी सुद्धा शिक्षिकेने त्याला पैकीच्या पैकी मार्क्स दिलेत. इतकेच नाही तर त्याला A ग्रेड मिळाला. कोरा कागद देऊनही असं कसं झालं? हे जाणून घेऊ...

निंजा कल्चरवर मिळाली होती असाइन्मेंट

एमी हागा ही मी युनिव्हर्सिटीची क्लब मेंबर आहे. तिला निंजा कल्चरवर असाइन्मेंट देण्यात आली होती. युनिव्हर्सिटीमध्ये जपानचा इतिहास आणि निंजा कल्चरबाबत शिकवणाऱ्या युजी यमादा यांनी आश्वासन दिलं होतं की, त्या क्रिएटिव्हिटीसाठी अधिकचे मार्क्स देईल. एमीने असं काही केलं ज्याने युजी फार प्रभावित झाल्या. त्यामुळेच त्यांनी एमीला पूर्ण मार्क्स दिलेत.

कोऱ्या कागदासोबत होतं एक मेसेज कार्ड

एमीने असाइन्मेंट लिहिण्यासाठी स्वत: एक अदृश्य शाई तयार केली होती. तिने सोयाबीनपासून ही शाई तयार केली आणि त्यानेच कोऱ्या कागदावर असाइन्मेंट लिहिली. एमी आणि तिच्या क्लासमधील इतरांनाही काही दिवसांपूर्वी हत्यारांची समज विकसित करण्यासाठी म्युझिअमला नेण्यात आलं होतं. असाइन्मेंट याच संबंधित होता. युजी सांगतात की, एमीने मला जे मेसेज कार्ड दिलं होतं, त्यावर लिहिलं होतं की, असायन्मेंट वाचण्याआधी आगीजवळ धराल. 

(Image Credit : dailymail.co.uk)

युजी यांनी सांगितले की, माझ्या लक्षात आलं होतं की, असाइन्मेंट वाचण्यासाठी मला घरी जावं लागेल. मी गेले आणि एमीने असाइन्मेंटमध्ये लिहिलेलं सगळं वाचलं. तिने जे केलं ते पाहून मी प्रभावित झाले होते.

एमी १९ वर्षांची आहे. तिने सोयाबीन्स रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले. सकाळी सोयाबीन्स बारीक करून ते एका पेस्टमध्ये मिश्रित केले आणि शाई तयार केली. एमीने एका वृत्तपत्राला सांगितले की, तिने याचा प्रयोग तीन वेगवेगळ्या कागदांवर केला. पण समस्या ही होत होती की, कागद पातळ असल्याने तो आगीवर धरताच जळायचा. जर जाड असेल तर शाई लवकर सुकत नव्हती. युजी सांगतात की, 'आम्ही क्लासमध्ये अदृश्य शाईबाबत चर्चा केली होती. पण कधी विचार नव्हता केला की, कुणी याचा वापरही करेल'.


Web Title: Student received full marks for handing in a blank report as assignment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.